Hero Image

आयपीएल 2024 दरम्यान गदरोळ, संघ आता रिटेन करु शकणार फक्त एकच खेळाडू ?


बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांमधील 16 एप्रिल रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीत खेळाडू रिटेन करणे आणि पर्समनी वाढवणे यावर चर्चा होणार होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये 8 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम लागू केला जाऊ शकतो. पण काही संघमालक या नियमाच्या विरोधात आहेत.

संघ मालकांचे मत आहे की फक्त एकच खेळाडू कायम ठेवावा आणि उर्वरित 7 खेळाडूंना राईट टू मॅच या पर्यायाखाली ठेवावे.

यामुळे खेळाडूंचे बाजारमूल्य आणि पारदर्शकता कायम राहील.

दरम्यान, राईट टू मॅचवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पर्यायामुळे मालकाला स्वतःचा खेळाडू विकत घेण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. जास्त बोलीमुळे, फ्रँचायझी त्या खेळाडूला विकत घेऊ शकणार नाही.

मात्र, असे झाल्यास आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना फायदा होईल. त्यांना अधिक पैसे कमविण्याची संधी मिळू शकते.

The post आयपीएल 2024 दरम्यान गदरोळ, संघ आता रिटेन करु शकणार फक्त एकच खेळाडू ? appeared first on Majha Paper.

READ ON APP