Hero Image

नितीन गडकरींचा मेगा प्लॅन; महामार्गांवरील टोलवसुलीचे सध्याचे नियम संपणार, सॅटेलाइट बेस्ड सिस्टम सुरु होणार

GPS टोल कलेक्शन सिस्टीम: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली करण्यासाठी लवकरच सॅटेलाइट बेस्ड सिस्टम सुरू केली जाईल. टोलवसुलीची सध्याची पद्धत रद्द करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच, रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घोषणा केली होती की एनएचएआय मार्च 2024 पासून महामार्गावर टोल वसूलीची नवीन सिस्टम लागू करेल.
बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाईलनितीन गडकरी यांनी सांगितले की, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांनी प्रवास केलेल्या अंतराएवढा टोल टॅक्स त्यांच्या बँक खात्यातून कापला जाईल. गडकरी पुढे म्हणाले की, महामार्गामुळे लोकांचा वेळ आणि इंधनही वाचते. तसेच पूर्वी मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी 9 तास लागायचे पण आता हा प्रवास फक्त 2 तासात पूर्ण करता येतो. कसे काम करणार GPS बेस्ड टोल सिस्टम?जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे, मात्र ही नवी यंत्रणा कशी काम करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
NHAI जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोल संकलन सिस्टम सुरू करणार आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना टोल आकारण्यासाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी वाहनधारकांच्या बँक खात्यातून ही रक्कम कापली जाईल.(वाचा)- रेनॉल्ट-निसानचा फ्यूचर प्लॅन! पुढील वर्षी भारतात आणखी 3 नवीन उत्पादने लाँच करणार ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर आवश्यक जीपीएस आधारित टोल प्रणाली महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या जीपीएस निर्देशांकांशी जोडली जाईल.
आणि वाहन कलेक्शन पॉईंटवर पोहोचताच, टोल फी आपोआप बँक खात्यातून कापली जाईल. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी, सर्व वाहनांना जीपीएसद्वारे सॅटेलाइटशी मॉनिटर करता येईल अशा नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. यासाठी हायवेवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत जे GPS सक्षम नंबर प्लेट्स वाचू शकतात. याद्वारेच ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील. फास्टॅगमुळे टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी होतोसध्या महामार्गावरील टोल वसुलीसाठी फास्टॅगचा वापर केला जातो.
फेब्रुवारी 2021 पासून चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले. आरएफआयडी तंत्रज्ञानाद्वारे टोल वसूल केला जातो. फास्टॅगमध्ये एक लहान RFID चिप आहे जी टोल बूथ वाचकांशी संवाद साधते. 2018-19 मध्ये, टोल प्लाझावर कोणत्याही वाहनाची सरासरी प्रतीक्षा वेळ 714 सेकंद होती, जी फास्टॅग सुरू झाल्यानंतर 47 सेकंदांवर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेसोबतच इंधनाचीही बचत होत आहे.

READ ON APP