Hero Image

Volvo आता नाही बनवणार डिझेल व्हेरिएंट कार्स! इलेक्ट्रिक वाहनांवर राहणार फोकस

Volvo End Diesel Variant Vehicles Volvo ने आपल्या डिझेल व्हेरिएंटमधील कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने ठरवले आहे की, 2030 सालापर्यंत व्होल्वो फक्त इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
अशा परिस्थितीत व्होल्वोही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याच्या तयारीत आहे. डिझेल व्हेरिएंटचे उत्पादन थांबलेकंपनीने या आठवड्यात डिझेल व्हेरिएंटचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑटोमेकरने मंगळवार, 26 मार्च रोजी स्वीडनमधील टॉर्सलँड प्लांटमध्ये त्याच्या डिझेल व्हेरिएंटचे शेवटचे मॉडेल लाँच केले. Volvo XC90 हे स्पोर्ट युटिलिटी वाहन आहे. कंपनी गॅसोलीन इंजिनचे उत्पादन सुरू ठेवेल.(वाचा)- Tata Nexon.ev Vs Mahindra XUV400 Pro: कोणत्या कारची आहे सर्वाधिक रेंज? जाणून घ्या सविस्तर डिटेल्स
विक्रीवर परिणाम होईल का?मीडियाला दिलेल्या मुलाखतीत व्होल्वोचे नवीन कार आणि ऑपरेशन्स स्ट्रॅटेजी एक्झिक्युटिव्ह एरिक सेवेरिन्सन म्हणाले, 'आम्हाला खात्री आहे की डिझेलशिवायही आमच्याकडे ग्राहकांच्या चांगल्या ऑफर आहेत'. साधारणपणे, कंपन्या त्यांचे कोणतेही प्रकार बंद करण्याबाबत कोणतीही वचनबद्धता व्यक्त करताना दिसत नाहीत. त्याऐवजी, कंपन्या नवीन मॉडेल्स लाँच करतात आणि जुन्या व्हेरिएंटची निर्मिती थांबवतात. पण व्होल्वोने संपूर्ण माहितीसह 2030 पर्यंत डिझेल व्हेरिएंटचे उत्पादन थांबवले आहे.(वाचा)-
महिंद्रा थारवर भारी पडणार ‘ही’ नवीन ऑफ-रोडिंग एसयूव्ही; 4x4 कॉन्फिगरेशनसह पॉवरफूल इंजिनसह असेल सुसज्ज व्हॉल्वो म्युझियमव्होल्वोने 2014 मध्ये XC90 सह रिवाइवल केले. आता व्होल्वो म्युझियममध्ये शेवटचा XC90 प्रदर्शित करेल. हे व्हॉल्वो म्युझियम पुढील महिन्यात गुटेनबर्ग येथे सुरू होणार आहे. डिझेल प्रकारातील वाहनांचे उत्पादन बंद केल्यानंतरही कंपनी या व्हेरिएंटमधील ग्राहकांना पाठिंबा देईल आणि त्याच्या स्पेयर पार्ट्सची विक्रीही सुरू ठेवेल.

READ ON APP