Hero Image

Top Gainer Stock : रेल्वेकडून 'या' कंपनीला 487 कोटींची ऑर्डर; शेअर्सची तुफान खरेदी, किंमत पोहचली 199 रुपयांवर

GPT Infrastructure Share : आज बुधवारी ट्रेडिंग दरम्यान जीपीटी इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवली गेली. कंपनीचे शेअर्स आज इंट्राडे 16 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आणि 199 रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे मोठी ऑर्डर आहे. ती म्हणजे, कोलकात्याच्या बांधकाम कंपनीला मध्य रेल्वेकडून 487 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. ऑर्डरचे तपशील कायकंपनीने म्हटले की ही ऑर्डर कंपनीच्या संयुक्त उपक्रम युनिटकडून प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये जीपीटी इन्फ्राची 26 टक्के भागीदारी आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर-उस्मानाबाद विभागात नवीन बीजी लाईनच्या बांधकामाचा समावेश आहे. गेल्या महिन्यात जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या संयुक्त उपक्रमाने (JV) ने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील उत्तर मध्य रेल्वेकडून 135 कोटी रुपयांची ऑर्डर जिंकली होती.
या ऑर्डरमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या विविध बांधकामांचा समावेश होता. जीपीटी इन्फ्रा या कंपनीचा करारात 51 टक्के हिस्सा आहे. या ऑर्डरमध्ये मातीकाम, छोटे पूल बांधणे, भुयारी मार्ग, बाजूचे नाले आणि टो वॉल यासारख्या कामांचा समावेश आहे. इतकेच नाही तर जुलै 2023 मध्ये, GPT समूहाच्या प्रमुख कंपनीने दक्षिण पूर्व रेल्वेच्या मुख्य सामग्री व्यवस्थापनाकडून 64 कोटी रुपयांची ऑर्डर जिंकली होती. डिसेंबर तिमाही निकालजीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्सने डिसेंबर 2023 मध्ये स्टँडअलोन तिमाही आकडेवारी नोंदवली होती.
ज्यामध्ये निव्वळ विक्री 246.08 कोटींवर पोहोचली होती. डिसेंबर 2022 मध्ये नोंदवलेल्या 192.64 कोटींपेक्षा हे 27.74 टक्के जास्त होते. डिसेंबर तिमाहीत तिमाही निव्वळ नफा 15.02 कोटी होता, जो डिसेंबर 2022 मध्ये नोंदवलेल्या 9.05 कोटी पेक्षा 66.02 टक्के जास्त होता. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी सिव्हिल आणि बेसिक इन्फ्राच्या बांधकाम आणि अंमलबजावणीतील आघाडीची कंपनी आहे. यासोबतच कंपनी पूल, रस्ते, रेल्वे व्यवस्था आणि शहरी वाहतूक निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.

READ ON APP