Hero Image

Share Market Closing : सेन्सेक्सची 655 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची वाढ

मुंबई : आर्थिक वर्ष 2023-24 मधील भारतीय शेअर बाजाराचे शेवटचे ट्रेडिंग सत्र गुंतवणूकदारांसाठी लाभाचे ठरले.बँकिंग एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे एका वेळी सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची तर निफ्टीमध्ये 390 अंकांची वाढ झाली. मात्र प्रॉफिट बुकींगमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकावरून खाली आला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स 655 अंकांच्या उसळीसह 73,651 अंकांवर बंद झाला.
तर निफ्टी 203 अंकाने वधारून 22,327 अंकांवर बंद झाला.आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. फक्त मीडियाचे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 4 शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीसह आणि 8 घसरून बंद झाले.शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 386.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 383.85 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.आज बजाज फायनान्स 3.91 टक्के, बजाज फिनसर्व्ह 3.09 टक्के, एसबीआय 2.53 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.26 टक्के, पॉवर ग्रिड 2.21 टक्के, टाटा स्टील 2 टक्के आणि लार्सन 1.83 टक्के वाढीसह बंद झाले. तर ॲक्सिस बँक 0.50 टक्के, रिलायन्स 0.37 टक्के, टेक महिंद्रा 0.26 टक्के आणि एचसीएल टेक 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

READ ON APP