Hero Image

'या' मल्टीबॅगर शेअर्सकडून 30 हजार टक्के परतावा, नवीन ऑर्डरनंतर कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत

मुंबई : आयटी उद्योगाशी संबंधित असलेल्या डायनाकॉन्स सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्सचे शेअर्स बुधवार, 27 मार्च रोजी 19 टक्क्यांहून अधिक वाढीसह 936.55 रुपयांवर बंद झाले. तर गुरूवारी शेअर्स तब्बल 132 रुपयांनी वाढून 1069 रुपयांवर गेला आहे. मोठी ऑर्डर
डायनाकॉन सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून 41.72 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही ऑर्डर डेटा सेंटर टेक रिफ्रेश इनिशिएटिव्हसाठी आहे. 30 हजार टक्के वाढ गेल्या काही वर्षांत डायनाकॉन्स सिस्टम्सच्या शेअर्समध्ये 30 हजार 100 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स7 मार्च 2014 रोजी 3.10 रुपयांवर होते. तर 27 मार्च 2024 रोजी शेअर्स 936.55 रुपयांवर पोहोचले आहेत.
एखाद्या व्यक्तीने 7 मार्च 2014 रोजी डायनाकॉन सिस्टम्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य 3.02 कोटी रुपये झाले असते. डायनाकॉन सिस्टम्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 952.25 रुपये तर नीचांकी पातळी 283.30 रुपये आहे. 4 वर्षात शेअर्स 6400 टक्के वाढलेडायनाकॉन्स सिस्टम्सच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. चार वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 6400 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.
डायनाकॉन सिस्टम्सचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 14.35 रुपयांवर होते. तर 27 मार्च 2024 रोजी शेअर्स 936.55 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात डायनाकॉन सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये 215 टक्क्यांची मोठी उसळी दिसून आली आहे. कंपनीचे शेअर्स एका वर्षात 297.10 रुपयांवरून 936.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्याच वेळी या वर्षात आतापर्यंत शेअर्समध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डायनाकॉन सिस्टम्सचे मार्केट कॅप 1189 कोटी रुपये आहे.

READ ON APP