Hero Image

CUET UG Registration Date : सीयूईटी युजी साठी अर्ज करायला अंतिम मुदतवाढ; 'ही' ठरली अर्ज करण्याची शेवटची तारीख

CUET UG Registration Date : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG 2024) साठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार CUET UG साठी ३१ मार्च रात्री ९:५० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.UGC चे अध्यक्ष एम.
जगदीश कुमार यांनी X (पूर्वीचे Twitter) द्वारे घोषणा केली की CUET UG 2024 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. "उमेदवार आणि इतर भागधारकांकडून प्राप्त झालेल्या विनंत्यांनुसार, CUET-UG - 2024 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ रात्री ०९:५० पर्यंत वाढवण्यात आली आहे.", अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली. वेळापत्रकानुसार, परीक्षेच्या सिटी स्लिप्स ३० एप्रिल रोजी प्रसिद्ध केल्या जातील आणि प्रवेशपत्रे मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जातील.
CUET UG च्या परीक्षा १५ मे ते ३१ मे या कालावधीत होणार आहेत, ज्याचा निकाल ३० जूनपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. केंद्रीय, राज्य, खाजगी आणि डीम्ड-टू-बी अशा २०० हून अधिक विद्यापीठांमध्ये UG अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी CUET UG आयोजित केला जातो.
CUET UG 2024 साठी अर्ज कसा करावा?
  • CUET UG साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET-UG/ ला भेट दिली पाहिजे.
  • वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला नोंदणीसाठी लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि विहित नमुन्यात छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • आता अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • आता तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
  • परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेतली जाणार : CUET UG परीक्षा 2024 हायब्रीड पद्धतीने घेतली जाईल. CUET UG परीक्षा 2024 ही दोन शिफ्टमध्ये सकाळी ९ ते ११ आणि दुपारी १२.३० ते २ या वेळेत घेतली जाईल.

    READ ON APP