Hero Image

आणि हत्तींच्या संवेदनशीलतेची

- नारायण वाडदेकरहत्ती माणसासारखाच बुद्धिमान आणि संवेदनशील असतो. ‘न्यू सायंटिस्ट’ आणि अन्य नियतकालिकांत नामांकित हत्तीअभ्यासकांचे काही लेख आले आहेत. कॅरेन मॅकुम्ब, सिंथिया मॉस, ल्युसी बेकर, हॅना मुम्बी, पॉल चेज, जॉइस पूल यांसारख्या हत्तीतज्ज्ञांनी, हत्तींच्या नैसर्गिक अधिवासात पंचवीस वर्षे वा जास्त काळ घालवला आहे.
केनयातील अम्बोसेली नॅशनल पार्क, साम्बुरू नॅशनल रिझर्व्हमधील निरीक्षणांत दिसले आहे की, हत्तींना त्यांच्या स्थलांतरमार्गात मृत हत्तींचे अवशेष कोठे आहेत हे लक्षात असते. त्या जागी ते थबकतात. आपल्या नातलगांची हाडे-सुळे सोंडेने वर-खाली, बाजूला सरकवतात, कुरवाळतात, त्यांचा वास घेतात. हत्तींच्या पायाचे तळवे, अंगठे संवेदनशील असतात. पाय उचलून ते तळव्यांनी हलकेच मेलेल्या प्रिय हत्तींच्या अवशेषांना स्पर्श करतात. चाचपून ओळख पटवून घेतात. जणू काही मृत हत्तींच्या आठवणी जागवतात.
नंतरच (नाईलाजाने) पुढील मार्गाला लागतात.काही प्रयोगांत गेंडे, म्हशी अशा अन्य जातीच्या प्राण्यांची हाडे हत्तींच्या वाटेत हत्तींच्या हाडांशेजारी ठेवली. तेव्हा कळले की, हत्ती सरसकट एकूण एक प्राण्यांच्या हाडांकडे आकृष्ट होतात, असे नाही. गेंड्याच्या, म्हशींच्या हाडांजवळ ते थांबत नाहीत. स्पर्श करून लगेच दूर जातात. अन्य कळपातील हत्तींच्या हाडांजवळ थोडासा वेळ घालवतात. आपल्या कळपातील हत्तींच्या सांगाड्याकडे तुलनेने जास्त वेळ आणि स्वतःच्या नातलगांच्या, सवंगड्यांच्या अवशेषांबरोबर मुख्यतः कवट्यांना, सुळ्यांना स्पर्शत, ते बराच अधिक काळ व्यतीत करतात.हत्तीवर्तन अभ्यासकांच्या मते, हत्तीना बुद्धी आणि भावना असतात.
हत्तींचे भाऊबंद, जोडीदार जखमी झाले, तर ते त्यांची काळजी घेतात. त्यांच्या मंदावलेल्या वेगाने मुद्दाम सावकाश, कळपातील सर्वजण एकत्र राहतीलसे चालतात. आपण छोट्या बाळाच्या चालीने चालतो, तसे. काही वेळा परिस्थितीमुळे गतिमंद झालेल्या हत्तीसाठी कळप थांबून राहतो. भाऊबंद, सखे, मित्र, जोडीदार मरण पावले, तर हत्ती शोकमग्न होतात.इतका संवेदनाशील एवढा अवाढव्य, अफाट ताकदवान प्राणी मृत प्रियजनांना लक्षात ठेवतो. त्यांच्या हाडांच्या स्पर्शाने गहिवरतो, हे विलक्षण आश्चर्यकारक आहे.

READ ON APP