Hero Image

तरुणानं २ तास दार उघडलं नाही, पोलिसांनी तोडला दरवाजा, खोलीत शिरताच दिसलं असं काही, पाहून आवरणार नाही हसू

बाईज हॉस्टेल हे एक वेगळंच विश्व आहे. इथे अशा अशा गोष्टी घडतात ज्यांच्याबद्दल कधी कोणी कल्पनाही केली नेसल. इंटरनेटवर तर नुसतं बॉईज हस्टेल म्हणून सर्च मारा तुम्हाला असे असे व्हिडीओ दिसतील की पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करत असलेला एक विद्यार्थी बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडत नव्हता.
त्याच्या मित्रांनी अक्षरश: ढोल वाजवावा तसा दरवाजा बडवला. पण काहीच फायदा झाला नाही, आतमधून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. परिणामी हॉस्टेलमधील सर्व विद्यार्थी गोळा झाले अन् त्यांनी थेट पोलिसांना बोलावलं. मग पोलीस तो दरवाजा तोडून आतमध्ये शिरले. अन् त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून जणू त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. पोलिसांना त्या खोलीत जे दिसलं ते पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. खुद्द पोलीस सुद्धा काही सेकंदासाठी निशब्द झाले. हा खतरनाक व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच.

(फोटो सौजन्य - @rose_k01/Twitter)
खोलीमध्ये नेमकं घडलं तरी काय?

तर त्याचं झालं असं की, विद्यार्थी बराच वेळ दरवाजा ठोकत होते पण आतमधून काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. बरं, या खोलीची खिडकी देखील बंद होती त्यामुळे काय घडलेय हे कळायला मार्गच नव्हता. शेवटी खोलीत काहीतरी विपरित घडलेय या भितीनं विद्यार्थ्यांनी पोलिसांना बोलावलं. सुरूवातीला पोलिसांनी देखील दरवाजा ठोकून पाहिला पण पुन्हा तेच आतमधून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.

अखेर पोलिसांनी थेट दरवाजा तोडला. अन् आतमध्ये शिरले. पण खोलीत शिरताच पोलिसांनी पाहिलं की तो मुलगा शांतपणे बेडवर झोपला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो मुलगा इतका गाढ झोपला होता की दरवाजा ठोकण्याचा आवाज त्याला ऐकूच आला नाही. हा प्रकार पाहून खरंच पोलीस देखील गोंधळले की म्हणायचं तरी काय? (फोटो सौजन्य - @rose_k01/Twitter)


हा व्हिडीओ होतोय व्हायरल​

मुलगा गाढ झोपला होता

ही प्रकार नेमकं कुठे घडला याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ @rose_k01 या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या मुलाची फिरकी घेतलीये. कोणी म्हणतेय त्याच्या अंगात कुंभकर्ण शिरला होता तर कोणी म्हणतेय तो रात्रभर अभ्यास करून थकला असेल म्हणून इतका गाढ झोपला. असो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात कुठला विचार आला? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. (फोटो सौजन्य - @rose_k01/Twitter)

READ ON APP