Hero Image

लाल हिरवं की निळं सांगा पाहू ३ रुपयांत कुठलं सफरचंद खरेदी कराल? हे सोपं कोडं ९९ टक्के लोकांना सुटलेलं नाही

एक महिला सफरचंद खरेदी करण्यासाठी दुकानात आली आहे. तिच्यासमोर तीन प्रकारची सफरचंद आहेत. पहिलं ‘लाल’ ज्याची किंमत १ रुपये आहे. दुसरं ‘हिरवं’ ज्याची किंमत २ रुपये आहे. आणि तीसरं ‘निळं’ ज्याची किंमत ३ रुपये आहे. बरं, या महिलेकडे केवळ ३ रुपये आहेत. तर मग सांगा पाहू या तीघांपैकी कुठलं सफरचंद ती खरेदी करेल? आणि का? हे कोडं सोडवण्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंद आहेत.
चला तर मग पाहूया तुमच्यापैकी किती जण हे कोडं सोडवून दाखवू शकतात.
(फोटो सौजन्य - brightside.me)
कुठलं सफरचंद खरेदी कराल?

हे कोडं सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची आकडेमोड करण्याची गरज नाही. सामान्य ज्ञान वापरून तुम्ही हे कोडं सोडवू शकता. चला तर मग हे कोडं सोडवायला सुरूवात करूया.TikTokTikTokTikबराच वेळ शोधाशोध करून सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर सापडलेलं नाही का? तर मग निराश होऊ नका, खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.(फोटो सौजन्य - brightside.me)


हे आहे योग्य उत्तर

ही महिला लाल आणि हिरवं सफरचंद खरेदी करेल. कारण निळ्या रंगाचं सफरचंद कधीच कोणी पाहिलेलं नाही. तुम्ही कधी निळं सफरचंद पाहिलं आहे का? (फोटो सौजन्य - brightside.me)

READ ON APP