Hero Image

'डोक्यात वर्ल्डकप फिरतोय वर्ल्डकप!' रोहितनं घेतली कार्तिकची फिरकी, स्टंप माईक व्हिडीओ व्हायरल

दिनेश कार्तिक सध्या खतरनाक फॉर्ममध्ये आहे. समोर येईल त्या बॉलरची तो चटणी करतोय. लक्षवेधी बाब म्हणजे कालच्या मॅचमध्ये त्यानं जसप्रित बुमराला देखील सोडलं नाही. बुमराच्या भेदक बॉलिंगवर इतर फलंदाज गुडघे टेकत असताना कार्तिकनं मात्र षटकार ठोकून आपला क्लास दाखवला. पण ही तोडफोड बॅटिंग सुरू असताना रोहित शर्मा मात्र त्यांची चांगलीच फिरकी घेत होता.
त्याच्या डोक्यात वर्ल्ड कप फिरतोय म्हणून चांगली बॅटिंग करतोय असं म्हणत राहितनं त्याची चांगलीच फिरकी घेतली. रोहितचं हे संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं अन् आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. (फोटो सौजन्य - @mufaddal_vohra/Twitter)
​डोक्यात वर्ल्डकप फिरतोय वर्ल्डकप

रोहितचा स्वभाव हा फारच मिष्किल आहे असं म्हटलं जातं. तो वरकरणी शांत दिसत असला तरी अनेकदा लोकांच्या खोड्या काढतो.

यावेळी त्यानं दिनेश कार्तिकची फिरकी घेतली. दिनेश चौकार षटकारांची बरसात करत असताना रोहित त्याची फिरकी घेताना दिसला. “याला वर्ल्डकप सिलेक्शनसाठी पुश करायचं आहे. याच्या डोक्यात वर्ल्डकप सुरू आहे. वर्ल्डकप सुरू आहे वर्ल्डकप” अशी गंमतीशीर कमेंट त्यानं कार्तिकवर केली. ही कमेंट ऐकताच दिनेश देखील हसू लागला. पण त्यानं रोहितला काहीच उत्तर दिलं नाही. बहुदा त्याला आपला फोकस गमवायचा नव्हता. कारण त्यावेळी तो समोर येईल त्या बॉलरची धुलाई करत होता. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून रोहितचा हा गंमतीशीर अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
अनेकांनी त्याच्या या मिष्किल स्वभावाचं कौतुक करत “म्हणून आम्ही रोहितचे फॅन अहोत” असं म्हटलंय. (फोटो सौजन्य - rohit45_hitman_fan45/Instagram)


हा व्हिडीओ होतोय व्हायरल​

​MI नं केली RCB ची चटणी

मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची अक्षरश: चटणी केली.

RCB नं पहिली बॅटिंग करून १९६ धावा केल्या होत्या. पण हे आव्हान MI नं अगदी १५ व्या ओव्हरमध्येच पूर्ण करून IPL मधील दुसरा विजय सेलिब्रेट केला. पण ही मॅच कदाचित मुंबईनं खूप आधीच जिंकली असती पण मुंबई आणि विजय यांच्यामध्ये दिनेश कार्तिक उभा राहिला. त्यानं २३ बॉलमध्ये ५३ धावा करून RCB ला १९६ धावांवर पोहोचवलं. पण RCB च्या बॉलर्सनं इतकी खराब बॉलिंग केली की त्यांनी १५ व्या ओव्हरमध्येच मॅच गमावली. (फोटो सौजन्य - @cricbuzz/Twitter)

READ ON APP