Hero Image

आकर्षक व्याजदराचे प्रलोभन दाखवून कोट्यवधींची फसवणूक, 'राजस्थानी मल्टीस्टेट'च्या २३ संचालकांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, लातूर : राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये रक्कम ठेवल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवून एकाची एक कोटी ७५ लाख ८६ हजार २७५ रुपयांची फसवणूक केली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात सोसायटीच्या २३ जणांवर गुन्हा नोंद आहे. काय प्रकरण?अॅड. नंदकिशोर रामनिवास अग्रवाल (वय ८४, रा.
नवीन आदर्श कॉलनी, लातूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत रक्कम ठेवल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखविले. त्यानंतर अॅड. अग्रवाल यांनी ११ ऑगस्ट २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या काळात स्वतःच्या नावावर एक कोटी सात लाख ८५४ रुपये आणि पत्नी सरोजा नंदकिशोर अग्रवाल यांच्या नावावर ६८ लाख एक हजार ४२१ रुपये अशी एकूण एक कोटी ७५ लाख ८६ हजार २७५ रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टीस्टेटच्या एकूण २३ संचालकांवर गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी दिली. चंद्रलाल बियाणी, बालचंद लोंढा, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लड्डा, अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, नामदेवराव रोडे, प्रेमलता बाहेती, जगदीश बियानी, व्यंकटेश कुलकर्णी, सत्यनारायण लड्डा, गोकुळदास चांडक, बालकिशन मुंदडा, गंगाधर धूत, गोविंद कोठारी, कमलाकर कुलकर्णी, बालाप्रसाद बिदादा, पांडुरंग कचोलिया, गोविंदलाल पारीख, ओमप्रकाश मुंदडा, सत्यनारायण हेड्डा (सर्व रा.
लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

READ ON APP