Hero Image

रजत पाटीदारची तुफानी फटकेबाजी, आरसीबीने केला २०० चा पल्ला पार

हैदराबाद : रजत पाटीदार नावाचे तुफान आयपीएलच्या मैदानात गुरुवारी आल्याचे पाहाला मिळाले आणि त्याच्यापुढे हैदराबादच्या गोलंदाजांना लोटांगण घआलावे लागले. वादळी फटकेबाजी करत रजत पाटीदारने २० चेंडूंत ५० धावांची दमदार खेळी साकारली. विराट कोहलीनेही यावेळी अर्धशतक केले, पण त्याला ५१ धावा करण्यासाठी ४३ चेंडू खेळावे लागले. अखेरच्या षटकांत कॅमेरून ग्रीनने केलेल्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीला हैदराबादपुढे २०७ धावांचे आव्हान ठेवता आले.आरसीबीच्या संघाला फॅफ ड्यु प्लेसिसने दमदार सुरुवात करून दिली.
पण त्याला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्याला २५ धावाच करता आल्या. फॅफनंतर विल जॅक्सही फक्त सहा धावांवर बाद झाला. पण त्यानंतर आरसीबीची धावसंख्या कमालीची वाढायला लागली. कारण रजत पाटीदार फलंदाजीला आला आणि त्यानं संपूर्ण परिस्थितीतच बदलून टाकली. कारण पाटीदारने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. पाटीदार यावेळी हैदारबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत आरसीबीची धावगती वाढवत होता. रजतने यावेळी आपल्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीची धावगती रुळावर आणली.
कारण रजतने यावेळी फक्त २० चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. यामध्ये दोन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. पाटीदारची फलंदाजी जेव्हा सुरु होती तेव्हा विराटही खेळपट्टीवर होता, पण त्याच्याकडून मात्र एवढा आक्रमकपणा पाहायला मिळाला नाही. कोहलीने यावेळी आपले अर्धशतक झळकावले, पण त्यासाठी त्याने ३७ चेंडू घेतले. त्यानंतर कोहली जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कोहलीने यावेळी ४३ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५१ धावा केल्या.दिनेश कार्तिक या सामन्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
कार्तिकने ६ चेंडूंत दोन चौकारांच्या जोरावर ११ धावा केल्या. पण कॅनेरून ग्रीनने अखेरच्या षटकांमध्ये हैदाराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ग्रीनच्या या धमाकेदार फटकेबाजीमुळेच आरसीबीच्या संघाला २०० धावांचा पल्ला यावेळी ओलांडता आला.हैदराबादच्या संघात यावेळी जयदेव उनाडकटने पुनरागमन केले होते. या सामन्यात पुनरागमन करताना उनाडकटने सर्वाधिक तीन विकेट्स मिळवले.

READ ON APP