Hero Image

हुश्श... आरसीबी अखेर जिंकली, बलाढ्य हैदराबादचा विजयरथ रोखत साकारला दमदार विजय

हैदराबाद : सलग सहा सामन्यांतील पराभवाती मरगळ अखेर आरसीबीच्या संघाने झटकली. सनरायझर्स हैदराबादचा संघ हा दमदार फॉर्मात होता. सलग चार सामने त्यांनी जिंकले होते. पण यावेळी हैदराबादचा विजयरथ रोखण्यात आरसीबीला यश मिळाले. रजत पाटीदारचे तुफानी अर्धशतक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेर आरसीबीला सात सामन्यांत प्रथम विजय मिळवता आला.
रजतचे आक्रमक आणि विराट कोहलीच्या संथ अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला २०७ धावा करता आल्या होत्या. हैदारबादचा संघ २०८ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना पहिल्या षटकात मोठा धक्का बसला आणि तिथेच त्यांचे गणित फिस्कटले. त्यामुळे आरसीबीला यावेळी हैदराबादवर ३५ धावांनी विजय साकारता आला. या विजयासह आरसीबीचे या स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.आरसीबीने हैदराबादपुढे विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबाद आतापर्यंत २०० धावांचा पल्ला सहज गाठत होता, त्यामुळे हैदराबादचा संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते.
पण हैदराबादच्या संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. आरसीबीच्या जॅक विलने पहिल्याच षटकात ट्रेव्हिस हेडला बाद केले आणि हैदराबादला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून हैदराबादचा संघ सावरूच शकला नाही. एडन मार्करम आणि हेन्रिच क्लासिन यांना प्रत्येकी सात धावाच करता आल्या. अभिषेक वर्माने १३ चेंडूंत ३१ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार पॅट कमिन्सने मात्र जोरदार हल्ला आरसीबीच्या गोलंदाजीवर चढवला. त्यामुळे हैदराबादच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.आरसीबीच्या डावाला यावेळी चांगलाच आकार दिला तो रजत पाटीदारने.
रजतने विराटच्या साथीने आरसीबीचा डाव चांगलाच बांधला. रजतने जिथे २० चेंडूंत ५० धावा केल्या, तिथे कोहलीला ५१ धावा करण्यासाठी ४३ चेंडू लागले. कोहलीच्या फटकेबाजीच्या आरसीबीला फटका बसेल, असे वाटत होते. पण कॅमेरून ग्रीन आणि स्वप्निल सिंग यांनी अखेरच्या षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्यामुळेच आरसीबीच्या संघाला २०७ धावा करता आल्या.आरसीबीचा डाव संपला आणि त्यानंतर विराट कोहलीच्या फलंदाजीची जोरदार चर्चा सुरु होती. कोहलीवर त्यावेळी टीका होत होती. पण आरसीबीने विजय साकारला आणि त्यामुळे कोहलीवरील टीका कमी झाली.

READ ON APP