Hero Image

कोणत्याही महागड्या Cleaning Tool टूलचा वापर न करता स्वच्छ करा तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या पद्धत

Phone Cleaning: प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करत असतो, मात्र काही कारणास्तव लोक त्यांचे स्मार्टफोन नियमित स्वच्छ करू शकत नाहीत. अनेकदा यामुळे स्मार्टफोन खूप घाण होतो आणि त्याच्या पोर्टमध्ये धूळ आणि घाण साचते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर देखील परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमचा स्मार्टफोन फिट एंड फाइन ठेवायचा असेल आणि कोणत्याही समस्येपासून वाचवायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला ते सुद्धा कोणत्याही महागड्या टूल्सचा वापर न करता सहजपणे कसे स्वच्छ करायचे ते जाणून घ्या.
इअरबड्सचा करावा वापरस्मार्टफोनची स्वच्छता करतांना चार्जिंग पोर्टची स्वच्छता करणे अवघड ठरते. अशावेळी तुम्ही कॉटन इअरबड्स वापरून पाहू शकता. याद्वारे तुम्ही स्मार्टफोनचे चार्जिंग पोर्ट तसेच कॅमेरा आणि स्पीकर ग्रिल सहजपणे स्वच्छ करू शकता. माइक्रोफाइबर कापडाचा करा वापरतुम्ही तुमचा स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कापड वापरत असाल तर ते तातडीने बंद करायला हवे, कारण असे केल्याने स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर स्क्रॅचेस पडू शकतात. तुमचा स्मार्टफोन उत्तम व सुरक्षित पध्दतीने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही माइक्रोफायबर कापडाचा वापर करू शकता.माइक्रोफाइबरचे कापड अतिशय मऊ, सॉफ्ट आणि वजनाने हलके असते.
यामुळे तुमच्या स्मार्टफोनला कोणतीही इजा पोहचत नाही. हे कापड ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमधून १०० ते १५० रुपयांमध्ये सहज खरेदी करू शकता. या गोष्टी देखील लक्षात ठेवणे आवश्यकस्मार्टफोन साफ करताना त्याच्या स्क्रीनवर जास्त दबाव टाकू नये. असे केल्याने स्क्रिन फुटण्याची शक्यता असते. फोन हलक्या हातांनी स्वच्छ करा. बाजारात अनेक प्रकारचे क्लिनर उपलब्ध आहेत. काही लोक फोन स्वच्छ करण्यासाठी हाय कॉन्ट्रास्ट क्लिनर वापरतात. तर असे करणे हानिकारक ठरू शकते. तुम्ही नेहमी चांगल्या दर्जाचे क्लीनर वापरावे.
बाजारात उपलब्ध असलेले क्लिनर निवडावे ज्यामध्ये आयसोप्रोपाइल अल्कोहोलचे प्रमाण किमान 70 टक्के इतके असेल. या टिप्स तुम्ही इतरांसोबत शेअर करुन त्यांना देखील स्मार्टफोन क्लीन करण्याची योग्य पद्धत सांगू शकता.

READ ON APP