Hero Image

Airtelचा डबल धमका प्लॅन! रिचार्जसह युजर्सला Netflixचं सब्सक्रिप्शन मिळेल फ्री, जाणून घ्या किंमत

आपल्या आवडीच्या मुव्हिज, वेबसिरीज किंवा शोज बघायचे असल्यास युजर्सला OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागते. रिचार्जसोबत हा अतिरिक्त खर्च वाढतो. यात भारतात Netflix हे इतरांच्या तुलनेने सर्वात महाग व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म आहे. मात्र एअरटेल प्रीपेड युजर्सला या किमतीकडे बघायची गरज नाही. Airtel युजर्सला आता आपल्या रिचार्जसोबत Netflix पूर्णपणे मोफर बघायला मिळणार आहे.
काही ठराविक प्लॅन्सचे रिचार्ज केल्यास या सुविधेचा आनंद घेता येईल. एअरटेलकडे नक्कीच प्रीपेड प्लॅन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातून केवळ एका प्लॅनमधून रिचार्ज करून तुम्हाला मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे या प्लानसोबत नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन दिले जात आहे. त्याचा फायदा असा आहे की मोबाइल किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनशिवाय, वापरकर्ते लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर देखील ते बघू शकतील. एयरटेलचा Free Netflix प्लॅनAirtelचा एकमेव प्लॅन असेल ज्यात मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळेल.
या प्लॅनची किंमत 1,499 रुपये. हा प्लान 84 दिवसांच्या व्हॅलीडीटीशह मिळेल. रेग्युलर रिचार्जबद्दल बोलायचे झाल्यासबाबतीत यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगशिवाय, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळेल. तसेच, या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटाचा लाभ घेता येईल.प्लॅनसोबत मिळणारे इतर बेनिफिट्स म्हणजे Apollo 24/7 सर्कल एंट्रीव्यतिरिक्त, मोफत HelloTunes आणि Wynk Music मेंबरशिप मिळेल युजर्सला 84 दिवसांसाठी Netflix (बेसिक) सबस्क्रिप्शन दिले जाईल, जे Airtel Thanks ॲपवर मिळवले जाऊ शकते.पात्र युजर्सनं हे रिचार्ज केल्यास अनलिमिटेड ५जी डेटाचा लाभ मिळेल.
यासाठी कंपनीची ५जी सेवा युजरच्या आसपासच्या परिसरात उपलब्ध असणे आवश्यक आहे.

READ ON APP