Hero Image

४ की १२? नेमका किती जीबी रॅम असलेला फोन घ्यावा? थोडक्यात समजून घ्या

स्मार्टफोन खरेदीच्या वेळी रॅमची निवड हा एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न अनेकांना सतावतो. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो की त्यांच्यासाठी किती जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बेस्ट आहे. या प्रश्नाला ठराविक असं उत्तर देणं तसं कठीण काम आहे. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते त्यानुसार रॅमची आवश्यकता बदलते. तुम्ही स्मार्टफोन किती आणि कशासाठी वापरता यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असते.
तसेच जुना झाल्यावर स्मार्टफोन स्लो देखील होतो, याचा देखील विचार झाला पाहिजे. यासाठी एक खास फॉर्मुला देखील लक्षात ठेवला पाहिजे, ज्यामुळे तुमचा फोन कधीच स्लो होणार नाही. किती जीबी रॅम असलेला फोन खरेदी करावा?
  • जर तुम्ही फोन अत्यंत बेसिक कामांसाठी म्हणजे कॉल, मेसेज, वेब ब्राउजिंग, सोशल मीडियासाठी वापरण्यासाठी करत असाल तर तुमच्यासाठी ४जीबी रॅम असलेला फोन बेस्ट ठरेल.
  • जर तुम्ही फोनमध्ये गेमिंग, व्हिडीओ एडिटिंग असं मल्टीटास्किंग करत असाल तुमच्यासाठी ६जीबी ते ८जीबी रॅम असलेला स्मार्टफोन योग्य ठरेल.
  • जर तुम्ही हेव्ही गेमिंगसाठी फोन वापरत असाल तसेच ४के व्हिडीओ एडिटिंग करत असाल तर तुमच्यासाठी १२जीबी रॅम असलेला फोन हवाच.
  • प्रोसेसर तसेच कोणत्याही फोनच्या स्पीडसाठी प्रोसेसर देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणून चांगला प्रोसेसर कमी रॅमसह देखील चांगला स्पीड देतो. जर फोनचा प्रोसेसर जुना असेल तर सोबत जास्त रॅम आवश्यक आहे. जर तुम्ही फोन दीर्घकाळ वापरणार असाल तर तुमच्यासाठी ६ जीबी रॅम बेस्ट ठरेल. जास्त रॅममूळे फोनचे नुकसान विशेष म्हणजे जितका जास्त रॅम तितकची फोनची किंमत वाढते.
    तसेच जास्त जीबी रॅम असलेल्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. फोनची देखील यात महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे युजर्सना जास्त जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन खरेदी केला पाहिजे. वर्चुअल रॅम म्हणजे काय? वर्चुअल रॅम म्हणजे फोनला जेव्हा हवं तेव्हा अतिरिक्त रॅमची ताकद देणं. परंतु यासाठी फिजिकली रॅम जोडला जात नाही तर इंटर्नल स्टोरेजचा वापर केला जातो. याला वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. उदाहरणार्त सॅमसंग ‘रॅम प्लस’, रियलमी ‘डायनॅमिक रॅम’ आणि विवो ‘वर्चुअल रॅम’ म्हणते.
    हा रॅम फिजिकल रॅम पेक्षा स्लो असतो कारण एलपीडीडीआर४एक्स किंवा एलपीडीडीआर५एक्स स्टोरेज ईएमएमएसी किंवा यूएफएस ३.१ स्टोरेजपेक्षा स्लो असते.

    READ ON APP