Hero Image

Gold Astrology : या लोकांनी चुकूनही घालू नये सोने, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Gold Astrology: सोने हा एक मैल्यवान धातू असून अनेकांना आंगावर सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते. सोन्याचे दागिने परिधान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. सोने केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर ते परिधान केल्याने अनेक फायदे देखील होतात. समाजात सोन्याचे अभूषण हे प्रतिष्ठा दर्शवणारे अभूषण म्हणून देखील पाहिले.

सोन्याचे दागिने घलणारे लोक सहज लक्ष वेधून घेतात. तर काही जण फक्त फॅशन म्हणून देखील सोन्याचे दागिने घालतात. तुम्ही देखील सोन्याचे दागिने घालत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण कोणत्या लोकांसाठी सोन्याचे दागिने घालणे शुभ आहे आणि कोणत्या लोकांनी सोन्याचे दागिने घालू नये या विषयी जाणून घेऊया.

या राशींच्या लोकांसाठी सोने ठरते फायदेशीर
तूळ राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांनी सोने परिधान करणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, तूळ राशीच्या लोकांनी सोने घातल्यास त्यांची धन संबंधित समस्या दूर होते. तसेच त्यांना पैशांची चणचण भासत नाही.

मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी देखील सोन्याचे दागिने खूप शुभ ठरतात. सोन्याचे दागिने घातल्याने अनेक दोष दूर होतात. याचा परिणाम होत घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. तसेच घरात सकारात्मक वातावरण टिकून राहत सुख-शांती कायम राहते.

गुरुदोष होतो दूर
मान्यतेनुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी मानला जातो. गुरु ग्रह हा व्यक्तीच्या विवाह आणि प्रगतीचा कारक आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने धारण केल्याने कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते. गुरु मजबूत असल्यास जीवनात यश मिळण्याची शक्यता वाढते. अशात सोन्याची अंगठी धारण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. याशिवाय अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील दूर होतात. यासह व्यक्तीच्या मान-सन्मानात देखील वाढ होते.

या लोकांनी सोन्याचे दागिने घालू नये
ज्योतिषशास्त्रानुसार, सोने हे शुभतेचे प्रतीक असले तरी काही राशींच्या लोकांसाठी सोने खूपच अशुभ ठरते. या लोकांनी सोने घातल्यास त्याच्या जीवनात अनेक अडचणी वाढू लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, वृश्चिक, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने घालू नये असा सल्ला देण्यात येतो. यासह जे लोक शनी ग्रहाशी संबंधित काम जसे कोळसा, तेल किंवा लोखंडाचे काम करतालत त्यांनी देखील सोने परिधान करणे टाळावे. या लोकांना सोने धारण केल्याने त्यांच्या वसायावर वाईट परिणाम होते.

(टीप - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Marathi Times Now News या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

READ ON APP