Hero Image

Sankashti Chaturthi 2024 Vrat Katha : जीवनातील सुख-समृद्धीसाठी संकष्ट चतुर्थीला करा या कथेचा पाठ

Sankashti Chaturthi 2024 Vrat Katha : हिंदू मान्यतेनुसार, कोणतेही शुभ कार्य असो गणेश पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे. गणपतीला चतुर्थी तिथी प्रिय आहे. त्यानुसार, शनिवार, 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते.

मान्यतेनुसार, या प्रसंगी गणपतीची विधिवत पूजा करून व्रत करण्याची प्रथा आहे. या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रत कथा वाचन महत्त्वाचे आहे. असे केल्याने गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. चला, जाणून घेऊया व्रताशी संबंधित पौराणिक कथा.

अशी आहे पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा माता पार्वती आणि शिव नदीजवळ बसले होते, अचानक माता पार्वतीला चौपट खेळण्याची इच्छा झाली, परंतु त्यांच्याशिवाय, या खेळात निर्णायक भूमिका बजावणारे दुसरे कोणी नव्हते. त्यामुळे शिव आणि पार्वतीने मिळून मातीची एक मूर्ती बनवली आणि त्यात जीव ओतला. या मुर्तीतून बनलेल्या मुलाचा खेळ पाहून शिव-पार्वतीने त्याला योग्य निर्णय घेण्याची आज्ञा केली. माता पार्वती या खेळात शंकराचा वारंवार पराभव करत होती.

यानंतर दोघांमध्ये पुन्हा खेळ सुरू झाला आणि या ही वेळी पार्वतीने शिवाचा पराभव केला. खेळ सुरु असताना एकदा त्या मुलाने चुकून शिवला विजयी घोषित केले. ही चूक पाहून माता पार्वतीला राग आला आणि रागाच्या भरात मुलाला लंगडे होण्याचा शाप दिला. यानंतर मुलाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली, परंतु दिलेला शाप परत घेऊ शकत नाही, असे माता पार्वती म्हणाली. यावर, त्या बालकाने उपाय सुचवण्याची विनंती केली.

यावर माता पार्वतीने उपाय सांगत, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे व्रत आणि मनोभावाने व्रत करावा असे सागितले. यानंतर मुलाने माता पार्वतीने सांगितल्या प्रमाणे व्रत आणि विधीवत पूजन केले. त्यानंतर तो बालक शापातून मुक्त झाला. तेव्हापासून संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा व व्रताची सुरुवात झाल्याची मान्यता आहे.

(टीप - येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Marathi Times Now News या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

READ ON APP