Hero Image

Kotak Mahindra Bank: आरबीआयची कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई, नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी

Kotak Mahindra Bank Barred By RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बँकेवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवावे असेही निर्देश RBI ने बँकेला दिले आहेत.

यासंदर्भात आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे.

आरबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार 'भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून आज कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला तात्काळ प्रभावाने कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये नवीन ग्राहकांना त्याच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे ऑनबोर्ड करणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे समाविष्ट आहे. परंतु बँक आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवणार आहे.



दोन वर्षांच्या देखरेखीनंतर आरबीआयचा निर्णय
आरबीआयचा हा महत्त्वपूर्ण निर्णय 2022 आणि 2023 च्या सलग दोन वर्षांच्या देखरेखीनंतर आला आहे. या कालावधीत आरबीआयला बँकेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कमतरता आणि गैर-पालन आढळले. सर्वसमावेशक आणि वेळेवर या समस्यांचे निराकरण करण्यात बँक अपयशी ठरली. RBI ने IT इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, यूजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीकेज प्रतिबंधक स्ट्रॅटेजीज, बिझनेस कंटिन्युटी आणि डिझास्टर रिकव्हरी कठोरता आणि ड्रिल्स यांसारख्या क्षेत्रातील गंभीर कमतरता लक्षात घेतल्या.

समस्यांचे निराकरण करण्यात बँक अपयशी
आरबीआयने निवेदनात म्हटले की, "2022 आणि 2023 वर्षांसाठी बँकेच्या आयटी ऑडिटमधून उद्भवलेल्या महत्त्वपूर्ण चिंतेवर आणि वेळेवर आणि योग्य रीतीने या समस्यांचे निराकरण करण्यात बँकेचे सतत अपयश यावर आधारित या कृती आवश्यक आहे. आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेन्ट, यूजर अॅक्सेस मॅनेजमेन्ट, विक्रेता जोखीम व्यवस्थापन, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक धोरण, व्यवसायातील सातत्य आणि संकटानंतर पुनर्प्राप्ती प्रयत्न या क्षेत्रांमध्ये गंभीर कमतरता आणि गैर-पालन आढळून आले."

जोखीम आणि माहिती सुरक्षा ऑपरेशन्समध्ये कमतरता
आरबीआयच्या निवेदनात पुढे म्हटले की, सलग दोन वर्षे बँकेत नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यकतेच्या विरुद्ध आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा ऑपरेशन्समध्ये कमतरता असल्याचे आढळून आले. कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे त्वरित प्रभावाने थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु बँक आपल्या विद्यमान क्रेडिट कार्ड धारकांसह ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल.

READ ON APP