Hero Image

Travel Places : उन्हाळ्यात मुलांसोबत फिरायचा प्लॅन असेल तर भारतातील या सुंदर Eco Friendly स्थळांना भेट द्या

Eco Friendly spot in India : तुम्ही भारतातील नैसर्गिक स्थळांच्या शोधात असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही खास स्थळांची यादी आहे. आम्ही भारतातील सर्वात इको-फ्रेंडली पर्यटन स्थळे निवडली आहेत. ही ठिकाणे पर्यावरणाबाबत जागरूक प्रवाश्यांसाठी योग्य आहेत ज्यांना सुंदर लँडस्केपची हानी न करता देश एक्सप्लोर करण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणांना भेट द्या.

त्याचबरोबर ज्या पालकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत फिरायला जायचं आहे ते देखील या स्थळांना भेट देऊन गोड आठवणी तयार करू शकतात. (summer travel places visit these beautiful eco friendly places in india )

माजुली बेट, आसाम (Majuli Island, Assam)
माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट! आसाममध्ये वसलेले, हे सुंदर बेट त्याच्या अद्वितीय लँडस्केप आणि नैसर्गिक दृष्टिकोनामुळे जगभरातील लोकांना आकर्षित करते. या गोड्या पाण्यातील बेटावर कोणतेही प्रदूषण नाही आणि बेटावर एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकवरही बंदी आहे

पुद्दुचेरी (Puducherry)
पुद्दुचेरी हे प्राचीन समुद्रकिनारी शहर सुंदर वालुकामय किनारे, निळा महासागर आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेले आहे. हे सुंदर ठिकाण पर्यटकांना पर्यावरणपूरक मार्गाने शहराचे दृष्य बघण्यासाठी सायकल वापरण्याची विनंती करते. येथे तुम्हाला सायकलने हे शहर एक्सप्लोर करता येते.

डेरिंगबाडी, ओडिशा (Daringbadi, Odisha)
ओडिशाच्या पूर्व घाटावर स्थित, कंधमाल जिल्ह्यातील दरिंगबाडी हे भुवनेश्वरपासून सुमारे 251 किमी अंतरावर आहे. सुंदर हिल स्टेशन म्हणजे हिरव्या टेकड्या, नद्या आणि धबधबे. डरिंगबाडी हे ओडिशाच्या हिरव्यागार पर्यटन स्थळांचा चेहरा आहे.

खोनोमा, नागालँड (Khonoma, Nagaland)
नागालँडमधील खोनोमा गाव हे महाकाव्य आहे! तसेच हे भारतातील पहिले हरित गाव आहे. पण एक काळ असा होता जेव्हा खोनोमाचे रहिवासी उपजीविकेसाठी फक्त पक्षी आणि प्राण्यांची शिकार करण्यावर अवलंबून होते. पण, 1990 च्या दशकात, सरकारने शिकारीवर बंदी घातली आणि त्यानंतर लोकांनी ते भारतातील पहिले हरित गाव म्हणून विकसित केले!

थेनमाला, केरळ (Thenmala, Kerala)
थेनमाला (हनी हिल) हे भारतातील पहिले इको-टुरिझम केंद्र आहे हे अनेकांना माहीत नसावे. केरळमधील कोल्लम आणि त्रिवेंद्रम प्रदेशात स्थित, थेनमाला हे त्रिवेंद्रम शहरापासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. येथील लोक मुख्यतः मध आणि रबर यांसारख्या वनजन्य उत्पादनांवर आपला उदरनिर्वाह चालवतात.

सिक्कीम (Sikkim)
सिक्कीम हे पहिले भारतीय राज्य आहे ज्याने प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातली आणि लोकांना त्याऐवजी बांबूच्या बाटल्या वापरण्यास प्रोत्साहित केले. हे ठिकाण हिरव्या दऱ्या, सुंदर हिमनद्या, तलाव आणि राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे.


READ ON APP