Hero Image

Makeup Tips : नवरोबाची तक्रार टाळायची असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा अन् वेळ वाचवा

how to do makeup in less time: सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? अनेकांना मेकअपची खूप आवड असते. जोपर्यंत मुली सिंगल असतात त्यांना मेकअपची खूप आवड असते त्यांना वेषभूषा केशभूषा करायला खूप वेळ लागतो, पण लग्नानंतर अनेकदा गोष्टी बदलतात. महिलांना कामातून वेळ मिळत नाही ज्यामुळे त्या स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत तर मेकअप करणे तर दूरची गोष्ट.

तुम्हालाही मेकअप करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत. आता खूप कमी वेळात ग्लोइंग आणि मेकअप लूक मिळवा. तो कसा हे जाणून घेण्यासाठी या मेकअप टिप्स फॉलो करा. (Follow these 5 makeup tips and save time)


प्रत्येक स्त्रीला मेकअप करायला आवडते, त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. पण मेकअप करायला कमी वेळ असेल तर सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. जर तुम्ही अचानक प्रवास करण्याचा विचार करत असाल तर किंवा वेळेवर कोणता प्लॅन ठरला असेल तर आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सजेस्ट करणार आहोत.

बीबी किंवा सीसी क्रीम लावा
जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही बीबी किंवा सीसी क्रीम वापरू शकता. हे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सारखे काम करेल आणि तुमचा वेळही वाचवेल.

कन्सीलर
जर तुमच्या चेहऱ्यावर डाग किंवा काळी वर्तुळे असतील तर नक्कीच कन्सीलर लावा. थोड्या प्रमाणात कन्सीलर घ्या आणि बोटांनी मिसळा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारचे डाग लपतील.


काजळ
आयलायनर लावल्याने आपल्या डोळ्यांना आकार येतो आणि डोळे सुंदर आणि मोठे दिसतात. यासाठी तुम्ही आयलायनर किंवा काजळ लावू शकता. मात्र तुम्ही बाहेर जात असताना काजळाचा वापर करत असाल तर वॉटरप्रूफ काजळ वापरण्याचा प्रयत्न करा.

मल्टी यूज प्रोडक्ट्स
तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर अशी उत्पादने निवडा जी एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ब्लश वापरत असाल तर ते आयशॅडो म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

ब्लश आणि लिपस्टिक
ब्लश लावल्याने मेकअप फुलतो. म्हणून ब्लश लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिवसा कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही पीच कलरचा ब्लश लावू शकता. रात्री जायचे असेल तर गुलाबी रंगाचा ब्लश लावता येईल. लूक पूर्ण करण्यासाठी तुमच्या लूकनुसार तुम्ही चांगला रंग निवडू शकता.

READ ON APP