Hero Image

Buttermilk for hair: उन्हाळ्यात ताक पिण्यासोबत केसांनाही लावा, होतील अद्भुत फायदे

Buttermilk benefits for hair: आजच्या काळात, प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला केस गळणे, तुटणे तसेच अकाली केस पांढरे होण्याच्या समस्या सतावत आहे. याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येकजण विविध प्रकारचे रासायनिक उत्पादने वापरण्यास सुरुवात करतो. पण बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनांऐवजी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकता.

किंबहुना अनेकजण घरगुती उपयांचा अवलंब देखील करतात. मात्र जर तुम्हाला झटपट परिणाम हवे असतील तर तुम्ही ताकाचा वापर करू शकता. होय, उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी प्यायले जाणारे ताक केसांसाठी देखील अद्भुत आहे. चला तर मग जाणून घेऊयात केसांना ताक लावण्याचे फायदे आणि पद्धत.

वाढते प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केसांवर देखील पहायला मिळत आहे. जर तुम्हाला देखील केस गळती, कोरडे केस आणि कोंड्याची समस्या असेल तर ताक तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला केसांना ताक लावण्याचे फायदे सांगणार आहोत. त्यांना फॉलो करून तुम्ही केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकता.

केसांना ताक लावण्याचे फायदे
वाढत्या प्रदूषणामुळे तसेच केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर कोंडा होऊ शकतो. ज्यामुळे केस गळू शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केस ताकाने धुवा. ताकामध्ये असलेले पोषक तत्व टाळूची खाज आणि कोंडा होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

चमकदार केसांसाठी
केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात ताक घेऊन त्यात एक अंड, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, केळी आणि मध मिसळून त्याचे हेअर मास्क बनवा आणि केसांना लावावे लागेल.

पांढऱ्या केसांपासून सुटका
आजकाल प्रत्येकाचे केस वयाच्या आधीच पांढरे होत आहेत. अशा स्थितीत तुम्हाला काही कढीपत्ता बारीक करून ताकात मिसळावे लागेल. आणि नंतर ही पेस्ट केसांना लावावी लागेल. त्यानंतर केस धुवून काढा. असे नियमित केल्यास फरक दिसून येईल.

केस गळतीपासून आराम
केस मजबूत ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. ताकामध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे पोषण होते आणि त्यांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळतीची समस्याही दूर होते.

टाळूच्या संसर्गास प्रतिबंध
ताकाने केस धुतल्याने टाळूचे संक्रमण दूर होण्यास मदत होते.ताक हे जीवाणूनाशक आणि बुरशीविरोधी आहे. त्यामुळे ताकाने केस धुतल्याने टाळू निरोगी राहतो.

Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे, हा कोणत्याही प्रकारचा पात्र व्यवसाईक किंवा वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

READ ON APP