Hero Image

देशातील सर्वात महागडी Yamaha स्कूटर लॉन्च; लुक आणि इंजनसह मिळणार हे जबरदस्त फिचर्स, वाचा सविस्तर

Yamaha Aerox S Launched: यमाहा (Yamaha) ने एरोक्स (Aerox 155) स्कूटरचे नवीन S व्हेरिअंट भारतात लॉन्च केले आहे.विशेष म्हणजे कंपनीतर्फे या व्हेरिअंटमध्ये कीलेस एंट्री देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची किंमत स्टॅन्डर्ड मॉडेलच्या तुलनेत 3,000 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान या विशेष फिचरमुळे ही स्कूटर आता देशात किलेस एंट्री उपलब्ध असलेल्या काही स्कूटरपैकी एक बनली आहे.

यामध्ये होंडा एच स्मार्टचाही समावेश आहे. कीलेस एंट्रीच्या मदतीने तुम्ही फक्त बटण दाबून तुमची स्कूटर शोधू शकता. तसेच बटण दाबताच स्कूटरचे इंडिकेटर चालू होतात आणि आवाजाद्वारे त्याचे लोकेशन दिले जाते.

यामाहा एरोक्स एस
कंपनीने Arox S फक्त दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करुन दिली जात आहे. यात सिल्व्हर आणि रेसिंग ब्लू कलरचा समावेश आहे. ही आता देशातील सर्वात महागडी यमाहा स्कूटर बनली आहे. ज्याची किंमत MotoGP एडिशनपेक्षाही सुमारे 1,500 रुपये जास्त आहे. या व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 1,50,600 रुपये आहे. नवीन यामाहा एरोक्ससोबत ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय, स्कूटर व्हेरिएबल व्हॉल्व्ह ॲक्ट्युएशनसह लेस आहे. जी नवीन जनरेशनच्या 155 सीसी ब्लू कोअर इंजिनसह येते. कंपनीने यासोबत CVT गिअरबॉक्सही देण्यात आला आहे. हे इंजिन लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, SOHC इंजिन आहे. हे इंजिन 8,000 RPM वर 15 पीएस पॉवर आणि 6,500 rpm वर 13.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

ई20 इंधनावर देखील चालेल
Yamaha ने नवीन Aerox 155 स्कूटर ई 20 इंधनावर चालण्यासाठी सुसंगत बनवली आहे. म्हणजेच ही बाईक 20 टक्के इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलवर चालवता येते. याशिवाय, ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स सिस्टम OBD2 येथे ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच सामान्यत: यामध्ये हजार्ड सिस्टिमही सोबत देण्यात आली आहे. Yamaha Aerox 155 स्कूटर चार कलरमध्ये उपलब्ध आहे. ज्यात मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू, ग्रे वर्मिलियन आणि सिल्व्हर यांचा समावेश आहे. कंपनीने Aerox S व्हेरिअंटमध्ये कोणतेही टेक्निकल बदल केलेले नाहीत. त्याचे इंजिन खूप शक्तिशाली आहे आणि शहरी भागात हे 50.3 किमी प्रति लीटरचे मायलेज देते, तर हायवेवर स्कूटरचे मायलेज 57.2 किमी प्रति लीटर होते.

ओलाच्या किंमतीतही घट
ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या सर्वात स्वस्त स्कूटर S1X ची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. यापूर्वी 2 kW बॅटरी पॅकसह ही इलेक्ट्रिक स्कूटर 79,999 रुपयांना उपलब्ध होती, त्यानंतर त्याची किंमत 69,999 रुपये झाली आहे. याशिवाय, 3 kW आणि 4 kW व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 84,999 रुपये आणि 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

READ ON APP