Hero Image

Who won Yesterday's IPL Match in Marathi, RCB vs SRH: कालची IPL 2024 मॅच कोणी जिंकली?

Who won Yesterday's IPL Match in Marathi, RCB vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 41 वा सामना 25 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अशा स्थितीत आरसीबीने 20 षटकांत 7 विकेट गमावत 206 धावा केल्या. हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 207 धावांची गरज होती. मात्र हैदराबादची फलंदाजी फ्लॉप ठरली. त्यांना 20 षटकात 8 विकेट्सवर केवळ 171 धावा करता आल्या आणि 35 धावांनी सामना गमावला.

इंडियन प्रिमियर लीग 2024 च्या 41 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले. या दोन्ही संघातील पहिला सामना हैदराबादने पहिला सामना जिंकला होता. परंतु हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेलेल्या गुरुवारच्या सामन्यात आरसीबीने आपल्या पराभवचा वाचपा काढला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने सनरायझर्सचा फलंदाजांचा दबदबा देखील कमी केला आहे. सलग 4 विजयानंतर हैदराबादचा हा पहिला पराभव आहे. तर बेंगळुरूने 6 पराभवानंतर विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूचा हा या हंगामातील दुसरा विजय आहे.

रजत पाटीदारची 20 चेंडूत 50 धावांची वादळी खेळी
या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 206 धावा केल्या. विराट कोहलीने 51 धावांची महत्त्वाची अर्धशतकी खेळी खेळली, तर रजत पाटीदारने 20 चेंडूत 50 धावांची वादळी खेळी खेळून बंगळुरूचा स्कोअरबोर्ड धावता ठेवला. त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीनने देखील 20 चेंडूत 37 धावांची आक्रमक खेळी खेळली. या तिन्ही फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने हैदराबादसमोर विजयासाठी 207 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर नटराजनने २ विकेट मिळवल्या. याशिवाय पॅट कमिन्स आणि मयंक मार्कंडेने 1-1 विकेट घेतली.

आरसीबीने घालवला हैदराबादचा फलंदाजांचा दबदबाप्रत्युत्तरात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीलाच संघाला मोठे झटके बसले. परंतु सनरायझर्सकडून शाहबाज अहमदने 40 धावांची मौल्यवान खेळी खेळली, तर कर्णधार पॅट कमिन्स आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 31 धावांचे योगदान दिले. परंतु त्याला इतर कोणत्याही फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करताच आली नाही. बेंगळुरूकडून स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 2गडी बाद केले. विल जॅक आणि यश दयाल यांनी 1-1 विकेट घेतली.

आरसीबीचा 1 महिन्यानंतर दुसरा विजय
बंगळुरूने आयपीएलच्या या चालू हंगामात 1 महिन्यानंतर आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बंगळुरूने 25 मार्च रोजी पंजाब किंग्जचा पराभव करून पहिला विजय मिळवला होता. त्यानंतर सलग 6 पराभवांनंतर बेंगळुरूने हैदराबादविरोधात हा दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतील गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादने 8 पैकी 5 सामने जिंकले असून संघ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सर्वात खालच्या स्थानावर म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे. आरसीबीने आतापर्यंत 9 सामने खेळले असून केवळ 2 जिंकले आहेत. आरसीबीची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

READ ON APP