Hero Image

Ramnavami recipe : रामनवमी स्पेशल रेसिपी श्रीखंड

साहित्य: ताजे दही 1 किलो, साखर 1 किलो, थोडेसे केशरी रंग, वेलची पूड अर्धा चमचा, थोडी जायफळ पूड, चारोळी आणि इतर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे

कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून लटकवावे. पूर्ण पणे पाणी निघाल्यावर (4 ते 5 तास) दही कापडात काढून एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी. नंतर पुरणयंत्रात मिश्रण फिरवून घ्यावे. या व्यतिरिक्त भांड्याला पातळ कापड बांधूनही मिश्रण फेटू शकता किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार केलं जाऊ शकतं.

तयार मिश्रणात दोन-चार चमचे दुधात केशरी रंग घोळून मिसळावा. आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे. सर्व्ह करताना फ्रीजमधून काढून गार श्रीखंड सर्व्ह करावे.

READ ON APP