Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?
लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी...ईकेवायसी करताना सावधगिरी बाळगा...कारण, ईकेवायसीसाठी बनावट वेबसाईटही बनवण्यात आलीय...तुमची फसवणूकही होऊ शकते असा दावा केलाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आधार कार्डशिवाय ₹१५०० विसरा, e-KYC करण्याआधी वाचाeKYCच्या नावानं लाडकीच्या पैशांवर डल्ला?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केलीय...आणि सरकारकडून 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय...त्यामुळे अनेक महिला ऑनलाईन ईकेवायसी करत आहेत...मात्र, आता अनेक खोट्या वेबसाइट्स तयार झाल्याचं समोर आलंय...त्यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेज
लाडकीच्या eKYCच्या नावावर अनेक खोट्या वेबसाईट तयार झाल्यायत. लाडकी योजनेची eKYC असं गुगलवर सर्च केल्यास hubcomut.in नावाची वेबसाईट समोर येते. या वेबसाईटवर माहिती भरल्यास तुमची खासगी माहिती किंवा बँक खातं रिकामं होण्याची भीती आहे
हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त लाडकी लाभ घेतायत...आणि कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली...आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली.
लाडकी योजनेच्या eKYC च्या पडताळणीसाठी सरकारची वेबसाईट
अधिकृत वेबसाईटवर जाऊनच eKYC करावे
दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन eKYC करू नका
ladkibahin.maharastra.gov.in हीच वेबसाईट अधिकृत
कुठल्याही वेबसाईटचा युआरएलचा वापर करू नये
Ladki Bahin Yojana: घरबसल्या मिळवा १ लाखापर्यंत कर्ज; लाडकी बहीण योजनेतून सुरू करा व्यवसायलाडकींना ईकेवायसी करणं अनिवार्य केलंय...त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी केवायसीचे फॉर्म भरतायत...त्यामुळे केवायसी करत असताना अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा...गुगल सर्च करताना काही वेबसाईट चुकीच्या असू शकतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत eKYCच्या नावाखाली लाडकीच्या पैशांवर डल्ला बसू शकतो हा दावा सत्य ठरलाय.