ओठांना लिपस्टिक कशी लावायची, कसा द्यावा परफेक्ट लुक आणि शेप सोप्या टिप्सने दिसाल अधिक आकर्षक
सध्या ब्युटी ट्रेंड्स बदलत आहेत आणि वेगवेगळ्या शेड्स बाजारात येत आहेत.
लिपस्टिकपूर्वी ओठांना काय लावावे?
अनेकदा महिला डायरेक्ट ओठांना लिपस्टिक लावतात. पण केवळ लिपस्टिक लावण्यापूर्वीच नाही तर रोज तुम्ही स्किन केअर रूटीनमध्ये ही गोष्ट फॉलो करायला हवी. ज्यामुळे तुमचे ओठ चांगले राहतात. आपल्या ओठांवर आलेला डेड स्किन लेअर हटविण्यासाठी लिप स्क्रबचा वापर नियमित करायला हवा.
याशिवाय तुम्ही लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना लिप बाम लावावा, जेणेकरून ओठ काळे पडत नाहीत आणि योग्य आकारात तुम्हाला लिपस्टिक अप्लाय करता येते.
ओठ कोरडे होऊ देऊ नका
अनेकदा लिपस्टिक लावल्यानंतर ओठ कोरडे पडू लागतात. पण यापासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिप ऑईल लावा. तसंच दिवसातून ३-४ वेळा लिप बामचा वापर करावा. जेणेकरून ओठांची चांगली काळजी राहाते आणि ओठांचा आकारही लिपस्टिकमुळे काळा पडून बिघडत नाही. यामुळे ओठ मॉईस्चराईज राहण्यास मदत मिळते.
(वाचा - 9 तासांपर्यंत टिकून राहतील या long lasting lipsticks; तुमच्या ओठांना बनवतील आणखी सुंदर)
ओठांना परफेक्ट शेप देण्यासाठी?
ओठांना केवळ लिपस्टिक फासणे योग्य नाही तर ओठांचा आकर्षक आकार दिसणेही महत्त्वाचे आहे. ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही लिप लायनरचा वापर करावा. यामुळे ओठांचा आकार व्यवस्थित दिसतो आणि ऑम्ब्रे कलर इफेक्टही मिळतो. लिपस्टिक आणि लिप लायनरचे कलर कॉम्बिनेशन योग्य असावे हे लक्षात ठेवा.
(वाचा - Lipstick Tips : लिपस्टिक लावल्यामुळे तुमचे ओठ फाटतात? 5 टिप्स ठेवतील अतिशय मुलायम)
कशी लावावी लिपस्टिक
अनेकजण एका बाजूने ओढून वर आणि खाली अशी ओठांना लिपस्टिक लावतात. मात्र लिपस्टिक लावताना नेहमी ओठांच्या मधून लावायला सुरूवात करावी आणि नंतर बाहेरच्या बाजूला लावावी. आपल्या नैसर्गिक ओठांच्या आकाराप्रमाणेच लिपस्टिक लावा. नंतर टिश्यूच्या मदतीने एक्स्ट्रा लिपस्टिक काढा आणि ग्लॉसी दिसण्यासाठी त्यावर लिप ग्लॉस लावा.
स्किन टोनप्रमाणे निवडा लिपस्टिक
ओठांचा आकार योग्य दिसण्यासाठी तुम्ही स्किन टोनप्रमाणे लिपस्टिक निवडल्यास तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यास मदत मिळते.
गोरा रंग - तुमचा रंग जर गोरा असेल तर लाल रंग, पीच, न्यूड पिंक शेड, लाईट बरगंडी, मॅट लिपस्टिकचा वापर करावा
सावळा रंग - तुमचा रंग जर सावळा असेल तर हलक्या रंगाचे शेड्स वापरा, ज्यामुळे चेहरा खुलून येईल.
READ ON APP