Rohit Sharma: 'त्याला संघात ठेवायची काय गरज? संघाचं भविष्य...' रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेले भारताचे क्रिकेटर
नवी दिल्ली : रोहित शर्माची काहीही चूक नसताना त्याच्यााकडून वनडे कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. पण रोहित शर्माला संघातच ठेवून नका, असे धक्कादायक वक्तव्य आता भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने केले आहे.
रोहित शर्माने आठ महिन्यांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता आगामी २०२७ चा वर्ल्ड कप आहे. रोहितने या वर्ल्ड कपसाठी टी२० आणि कसोटी क्रिकेट सोडले आहे.कारण आता तो फक्त वनडे क्रिकेटवरच लक्ष केंद्रीत करणार आहे. पण तरीही रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घएत अजित आगरकर यांनी सर्वांनाच धक्का दिला. पण भारताच्या माजी क्रिकेटपटूने तर आता रोहितच्या भविष्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे.
भारताचे माजी निवड समिती सदस्य सबा करिम म्हणाले की, " रोहित शर्माला जर तुम्ही कर्णधारपद दिले नाही, तर त्याला संघात ठेवायची काय गरज आहे. संघाचं भविष्य काय असेल, याबाबत तुम्ही चर्चा करता, पण तुम्ही रोहित शर्माला तर भविष्यातील संघाचा भाग मानत नाही.या परिस्थितीत रोहित शर्माला संघात ठेवणे योग्य नाही. कारण रोहित शर्मा जर तुम्हाला २०२७ च्या संघात दिसत नाही, तर त्याला संघात ठेवून काय फायदा आहे. रोहित कर्णधार असो किंवा खेळाडू, त्याचा विचार तुम्ही करतच नसाल तर त्याला संघात का ठेवले गेले आहे, हा माझा प्रश्न आहे. निवड समितीने रोहित शर्माबाबत फार लवकर निर्णय घेतला आहे, एवढी घाई निवड समितीने करायला नको होती, असे मला वाटते. "
आगरकर यांनी सांगितले की, रोहितला कर्णधारपदावरून दूर करणे खूप अवघड होते. कारण त्याचे भारतीय क्रिकेटमधील योगदान खूप मोठे आहे.पण भविष्याचा विचार करून आणि संघाच्या हितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. संघ सध्या कुठे आहे आणि भविष्यात तो कुठे असावा, याचा विचार करून योग्य पाऊले उचलावी लागतात, असे आगरकर म्हणाले.
अजित आगरकर यांनी सांगितले, "भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला नसता तरी रोहितला कर्णधारपदावरून दूर करणे कठीणच गेले असते.क्रिकेटच्या कार्यक्रमात वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून नियोजन करत वाटचाल करावीच लागते." रोहितला या बदलाची माहिती आधीच दिली होती, असेही आगरकर यांनी सांगितले. पण त्या संवादाबद्दल जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, "तो संवाद माझा आणि रोहितमधलाच आहे..."
रोहित शर्माने आठ महिन्यांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता आगामी २०२७ चा वर्ल्ड कप आहे. रोहितने या वर्ल्ड कपसाठी टी२० आणि कसोटी क्रिकेट सोडले आहे.
भारताचे माजी निवड समिती सदस्य सबा करिम म्हणाले की, " रोहित शर्माला जर तुम्ही कर्णधारपद दिले नाही, तर त्याला संघात ठेवायची काय गरज आहे. संघाचं भविष्य काय असेल, याबाबत तुम्ही चर्चा करता, पण तुम्ही रोहित शर्माला तर भविष्यातील संघाचा भाग मानत नाही.
आगरकर यांनी सांगितले की, रोहितला कर्णधारपदावरून दूर करणे खूप अवघड होते. कारण त्याचे भारतीय क्रिकेटमधील योगदान खूप मोठे आहे.
Rohit Sharma
अजित आगरकर यांनी सांगितले, "भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला नसता तरी रोहितला कर्णधारपदावरून दूर करणे कठीणच गेले असते.
Next Story