IND vs PAK: पाकिस्तानवर नामुष्की, भारताकडून पराभव अन् वर्ल्ड कपमधून आऊट? पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल

Hero Image
Newspoint
नवी दिल्ली : भारताकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानसाठी आता मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण आता पॉइंट्स टेबलमध्ये आता मोठा बदल झाला आहे. हा बदल पाहून पाकिस्तान वर्ल्ड कपमधून आऊट झाला आहे की नाही, हे आता समोर आले आहे.

भारताच्या महिलांनी तर पाकिस्तानच्या संघाचा फडशाच पाडला.
भारताने धडाकेबाज फलंदाजी तर केलीच, पण अचूक गोलंदाजी करत पाकिस्तानला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. पण पाकिस्तानला या सामन्यानंतर एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूवर आयसीसीने कारवाई केली आहे. पण आता पॉइंट्स टेबलमध्येही पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

भारताने हा सामना जिंकला आणि त्यांनी अजून एकगुड न्यूज मिळाली. कारण भारताचा हा दुसरा सामना होता. यापूर्वीचा पहिला सामनाही भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताच्या खात्यात चार गुण जमा झाले.
या चार गुणांसह भारत आता अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. विजयानंतर भारताला गुड न्यूज मिळाली. पण पाकिस्तानला मात्र वाईट बातमी मिळाली आहे. पाकिस्तानचाही हा दुसरा सामना होता. पाकिस्तानला या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला अजूनही पॉइंट्स टेबलमध्ये गुणांचे खाते उघडता आले नाही आणि पराभवानंतर त्यांचा नेट रन रेटही घसरला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये जे अव्वल चार संघ असतील ते पुढच्या फेरीत जाणार आहेत.
त्यामुळे पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून आऊट होण्याच्या जवळ आला आहे. अजून दोन सामने त्यांनी गमावले तर त्यांचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येणार असल्याचे आता समोर येत आहे.
Video
पाकिस्तानच्या संघावर पराभवनंतर नामुष्कीची वेळ आली आहे, कारण ते आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ लवकरच वर्ल्ड कपच्या बाहेर जाऊ शकतो, असे आता म्हटले जात आहे. त्यामुळे येत्या २-३ सामन्यांत त्यांचे भवितव्य स्पष्ट होऊ शकते.