Rohit Sharma: रोहित शर्मासाठी अजून एक वाईट बातमी, सुनील गावस्कर यांनी अखेर खरं ते सांगून टेंशन वाढवलं..

Hero Image
Newspoint
नवी दिल्ली : रोहित शर्माकडून वनडे संघाची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. पण रोहित शर्मासाठी आता अजून एक वाईट बातमी आली आहे, जी भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितली आहे.

रोहित शर्माने टी २० वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही देशाला जिंकवून दिला.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताला फक्त आठ महिने झाले होते. रोहित चांगल्या फॉर्मात होता, पण तरीही त्याच्याकडून वनडे संघाची कॅप्टन्सी काढण्याचा अमानुषपणा अजित आगरकर यांनी केला. पण ही गोष्ट फक्त इथपर्यंत थांबत नाही तर आता भविष्यातील धोकेही सुनील गावस्कर यांना दिसले आहेत. त्यामुळे रोहित शर्मासाठी पुढचा काळ किती कठीण असणार आहे, हे आता समोर आले आहे.

सुनील गावस्कर म्हणाले की, " रोहित शर्मा आता टी २० आणि कसोटी सामने खेळू शकणार नाही. आता तो भारतासाठी फक्त आणि फक्त वनडे सामने खेळणार आहे.
तुम्ही जर आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहिलं तर जेव्हा क्रिकेट मालिका होता, त्यामध्ये कसोटी आणि टी २० सामन्यांचे प्रमाण जास्त असते. वनडे सामने जास्त खेळवले जात नाहीत. त्यामुळे आता जर तुम्ही २०२७ च्या वर्ल्ड कपचा विचार करत असाल, तर एक गोष्ट महत्वाची ठरते की, त्यापूर्वी रोहितला किती वनडे सामना खेळायला मिळतील. माझ्यामते रोहित २०२७ च्या वर्ल्ड कपपर्यंत संघात राहीला तर त्याला ५ ते ७ वनडे सामनेच खेळायला मिळू शकतात. या गोष्टीचा अर्थ असा आहे की, रोहित शर्माला जास्त वनडे क्रिकेटचा सराव करायला मिळणार नाही.
आता तो कर्णधारही नाही. त्यामुळे रोहित २०२७ चा वर्ल्ड कप खेळणे हे अवघड आहे. कारण एक तर सामने कमी खेळायला मिळतील आणि त्यामधील प्रत्येक कामगिरी तपासून पाहिली जाईल. "
Rohit Sharma

शनिवारी भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले की, रोहित शर्माला आता ODI संघाच्या कर्णधारपदावरून हटवले आहे.
विशेष म्हणजे, रोहितने नुकताच ICC चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला होता. असे असूनही त्याला कर्णधारपद सोडावे लागले. यामुळे तो चॅम्पियन्स करंडक जिंकूनही कर्णधारपद गमावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे ODI संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. पुढील वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी हा निर्णय घेतल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले.

रोहित शर्मासाठी येणारा काळ हा किती कठीण असणार आहे, हे आता सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.