IND W vs PAK W : भारताच्या वाघिणींनी वर्ल्ड कप गाजवला! दारूण पराभवानंतरही पाकिस्तानची कॅप्टन म्हणते, आम्ही जिंकलो असतो, पण...

Hero Image
Newspoint
मुंबई : महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ मध्य भारतीय महिला संंघाने कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान महिला संघाचा ८८ धावांनी पराभव केला. भारताच्या वाघिणींनीही पाकिस्तान संघाला त्यांची लायकी दाखवून दिली. या सामन्यामध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताना विजय मिळवला आहे. पहिल्यांदा बॅटींग करताना २४७ धावा केल्या होत्या, भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ १५९ धावांवर ऑल आऊट झाला.
या सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने नेमका कुठे सामना गमावला सांगितलं आहे.

पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप धावा दिल्या, डेथ ओव्हर्समध्ये पण हीच परिस्थिती होती. डायना बेग (१० ओव्हरमध्ये ६९ रन देऊन चार विकेट) सीम आणि स्विंगबद्दल थोडी गोंधळलेली होती. तिला सतत मार्गदर्शन करत होते. मला वाटते की ती पुढच्या मॅचमध्ये ठीक राहील. जर आम्ही भारताला २००च्या आत रोखलं असतं तर हा आमच्यासाठी चांगला स्कोर असता. टॉप-5 मध्ये 'प्युअर' फलंदाज आहेत. त्यांना पुढे येऊन चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
बॅटिंगमध्ये आम्हाला मोठ्या पार्टनरशिप्स कराव्या लागतील आणि परिस्थितीचे समजून घेत त्यानुसार खेळावे लागेल, असं फातिमा सना म्हणाली.


भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ केवळ १५९ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानच्या सिदरा अमीनने १०६ चेंडूत ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिच्या खेळीत ९ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता.
नतालिया परवेजने ३३ धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त पाकिस्तानचा इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.


सिदरा अमीन स्नेह राणाच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर डायना बेग दोन धावांवर क्रीजवर उपस्थित होती, तर नशरा संधूने खाते उघडले नव्हते. भारतासाठी क्रांती गौडने धमाकेदार गोलंदाजी केली. तिने १० षटकांत केवळ २० धावा देत तीन बळी घेतले. क्रांती गौडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. क्रांती गौडव्यतिरिक्त दीप्ती शर्माने तीन बळी घेतले.
राणाने दोन बळी घेतले.


दरम्यान, भारत सलग दुसरा सामना जिंकून महिला विश्वचषक गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारताचे ४ गुण झाले आहेत. पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचे खाते अजून उघडलेले नाही. भारतीय संघ वनडेमध्ये आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. टीम इंडियाने पाकिस्तानवरील विजयाचा विक्रम १२-० असा केला आहे.