रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यात रचणार इतिहास, 10 धावा केल्या की झालं..

Hero Image
Newspoint

Newspoint
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला एक डाव आणि 140 धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न असेल. (फोटो- BCCI Twitter)
Newspoint
पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने जबरदस्त खेळी केली. त्याने नाबाद 104 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक झळकालं. 176 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 5 षटकार मारत शतक ठोकलं. तसेच दुसऱ्या डावात 4 गडीही बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (फोटो- BCCI Twitter)

Newspoint
रवींद्र जडेजा 300 पेक्षा जास्त कसोटी बळी आणि सहा किंवा त्याहून अधिक शतके झळकावलेल्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे. यापूर्वी इयान बोथम (इंग्लंड), कपिल देव (भारत), रवी अश्विन (भारत), इम्रान खान (पाकिस्तान) आणि डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) यांनीच ही कामगिरी केली आहे. (फोटो- BCCI Twitter)
Newspoint
दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी असेल. 10 धावा केल्या कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा आणि 300 पेक्षा जास्त विकेट घेणारा दुसरा भारतीय आणि जगातील चौथा खेळाडू बनेल. यापूर्वी ही कामगिरी फक्त कपिल देव, इयान बोथम आणि डॅनियल व्हेटोरी यांनीच केली आहे. (फोटो- BCCI Twitter)
Newspoint
रवींद्र जडेजाने आतापर्यंत 86 कसोटी सामन्यांच्या 129 डावांमध्ये 38.73 च्या सरासरीने 3990 धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी ही नाबाद 175 आहे. जडेजाने चेंडूने 334 बळीही घेतले आहेत. (फोटो- BCCI Twitter)