बाळ मानेंच्या रूपाने भाजपचे एका दगडात २ पक्षी; ठाकरेंसोबत शिंदेंना धक्का!
बाळ माने यांनी विधान परिषद निवडणुकीतून अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि कोकणाच्या राजकारणात भूकंपच आला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मानेंची हकालपट्टी तर झालीच, पण माने यांची माघार म्हणजे एकट्या ठाकरेंना नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भाजपने दिलेला मोठा झटका ठरला आहे. २०२९ च्या दृष्टीने भाजपने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राणेंनी कोकणात आपलंच वर्चस्व दाखवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केल्याचं दिसतंय.
Read more