France Protest : पॅरिस मुस्लिम शहर होणार असल्याचा दावा, ट्रम्पचा Fear Politics चा डाव?

#DonaldTrump #FranceProtest #parisसध्या जगाचे लक्ष एका शहराकडे लागले आहे - पॅरिस. पण यावेळी कारण आयफेल टॉवर नाही, तर रस्त्यावर पेटलेली आग आहे. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून जी हिंसा सुरू आहे, तिने उग्र रूप धारण केले आहे. लिमोजसारख्या शहरातलं 150 वर्ष जुनं टाऊन हॉल, जे दुसऱ्या महायुद्धाच्या बॉम्बहल्ल्यातही वाचलं होतं, ते आंदोलकांनी जाळून टाकलं. आतापर्यंत 2400 हून अधिक लोकांना अटक झालीय, 3000 हून अधिक दुकानं लुटली गेलीत, आणि राजधानी पॅरिससह अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, ऐतिहासिक इमारतींना आग, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी - हे चित्र एखाद्या युद्धभूमीसारखं वाटतंय. आणि याच आगीवर आपल्या स्टाइलने तेल ओतलंय ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. ट्रम्प म्हणाले - "पॅरिस लवकरच मुस्लिम शहर बनेल आणि फ्रान्सने, किंबहुना संपूर्ण युरोपने आपल्या सीमा तातडीने बंद कराव्यात." त्यांनी थेट फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्थलांतर धोरणाला अपयशी ठरवलं.आता इथे दोन प्रश्न उभे राहतात. पहिला - फ्रान्समध्ये ही दंगल नेमकी का पेटली? आणि दुसरा - ट्रम्प म्हणतात तसं पॅरिस खरंच मुस्लिम शहर होतंय का? आणि फ्रान्स खरंच सीमा बंद करू शकतो का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ..Currently, the world's attention is focused on one city—Paris. But this time, the reason is not the Eiffel Tower, but the fires burning in the streets.The violence that has been unfolding in France over the past few days has taken a fierce form. In cities like Limoges, a 150-year-old Town Hall—which had survived even the bombings of World War II—was set on fire by protesters. So far, more than 2,400 people have been arrested, over 3,000 shops have been looted, and a curfew has had to be imposed in several cities, including the capital, Paris.Destruction of public property, fires set to historic buildings, chanting against the administration—this picture looks like a warzone. And adding fuel to this fire in his own style is US President Donald Trump.Trump said: "Paris will soon become a Muslim city, and France—in fact, all of Europe—should close its borders immediately." He directly labeled French President Emmanuel Macron's immigration policy a failure.Now, two questions arise here: Why exactly did this riot break out in France? Is Paris really becoming a Muslim city, as Trump claims? And can France actually close its borders? Let's understand all of this through this video.
Read more