अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या आखाड्यात ११ जागांसाठी रणधुमाळी, १० जागा बिनविरोध करण्यात यश
अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे सहकाराचा गड आणि या गडाची सर्वात मोठी तिजोरी म्हणजे अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक'! या बँकेवर कुणाची सत्ता राहणार? यावरून नेहमीच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं होतं—'जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार का?' संगमनेरपासून ते नगरच्या सर्किट हाऊसपर्यंत नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. कालपर्यंत एकमेकांचे कट्टर वैरी असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले, हसून फोटो काढले आणि संदेश दिला—'सहकारासाठी आम्ही एकत्र!'पण... काल रात्री उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम टप्पा पार पडला आणि या सर्व बैठकांचा 'फुसका बार' ठरला! २१ संचालकांच्या जागांपैकी केवळ १० जागा बिनविरोध करण्यात यश आलंय, तर उर्वरित ११ जागांवर आता आरपारची लढाई पेटली आहे. सर्वात मोठा धक्का कुणी दिला? तर महायुतीत असूनही स्वतंत्र चाल खेळणाऱ्या सभापती राम शिंदेंनी! आणि दुसरीकडे सहमतीच्या राजकारणाला थेट आव्हान दिलंय खासदार निलेश लंके यांनी! थोरात आणि विखे एकत्र येऊनही बिनविरोधचा फॉर्म्युला का ठरला अपयशी? राम शिंदे यांची ती ऐनवेळी केलेली 'सरप्राईज एंट्री' आणि '४ जागांचा डाव' काय आहे? खासदार निलेश लंकेंचं स्वतंत्र 'मंडळ' विखे-थोरातांना कसं भारी पडणार? आणि गेल्या वेळेस १७ जागा बिनविरोध होणारी बँक यंदा एवढ्या मोठ्या राजकीय संघर्षात का अडकली? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा
Read more