राज्यसभेवर जाण्यासाठी नवनीत राणांचं लॉबिंग, राष्ट्रवादीतून कडाडून विरोध, नाराजीही उघड
एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच, दुसरीकडे राज्यसभेच्या एका जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यसभेची ही एक जागा आता रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, १८ जूनला मतदान होणार आहे. तर ८ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा या रिक्त जागेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारिक पुणे मतदारसंघातून अचानक पक्षप्रवेश करून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता पक्ष सोडून भाजपत गेलेल्या नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या जागेसाठी कसं लॉबिंग सुरु आहे, नवनीत राणांना विरोध का होतोय, या सर्व प्रश्नांची सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Read more