Gokul Election Result : महायुतीत शह-काटशहाचं राजकारण, मंडलिकांकडून मुश्रीफांचा हिशोब चुकता
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारून करायचं - असं का म्हणतात हे गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी दाखवून दिलं. २५ च्या २५ जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना बंटी पाटलांनी चांगलाच करंट दिलाय. पश्चिम महाराष्ट्रातील अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारा आणि हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भवितव्य ठरवणारा 'गोकुळ दूध संघ' म्हणजे केवळ एक सहकारी संस्था नाही, तर कोल्हापूरच्या राजकीय सत्तेची मुख्य नाडी आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोकुळच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत आणि या निकालांनी कोल्हापूरच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी दाणादाण उडाली. वरवर पाहता ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी वाटत होती. मात्र, निकालाचे पदर जसजसे उलगडू लागले, तसतसा एक धक्कादायक पॅटर्न समोर आला! महायुतीच्या नेत्यांनीच प्रचारात एकीचा देखावा करत मतदानात एकमेकांचा काटा कसा काढला? संजय मंडलिक यांनी नविद मुश्रीफ यांचा पराभव करून जुना राजकीय बदला कसा पूर्ण केला? आणि या सगळ्या राजकीय चिखलफेकीत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी एकहाती 'गोकुळ'चं मैदान कसं मारलं? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया -
Read more