Nashik MLC Conflict : कुणाल दराडेंनी बाप काढला, महाजनांचा शब्दही डावलला; Gokul Gite थेट भिडले

#nashikmlcelection #gokulgite #narendradarade #bjp #shivsenaनाशिक विधानपरिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत हायव्होल्टेज ड्रामा घडल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र भाजपमधूनच बंडखोरी झाल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली. भाजप कार्यकर्ते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शेवटपर्यंत मनधरणी सुरु होती. मात्र वडिलांचा एकेरी उल्लेख केल्यानं दुखावलेल्या गोकुळ गिते यांनी ना भावाचं ऐकलं ना गिरीश महाजनांचं.. नाशिकमधील ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते. मात्र गोकुळ गिते यांनी आपला अर्ज आता कायम ठेवल्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतचं लढत होणार असल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओतून जाणून घेऊया..
Read more