Manoj Jarange Patil मराठ्यांसाठी पुन्हा उपोषणाला बसणार, नेमक्या मागण्या काय?

३० मे २०२६ अंतरवाली सराटीतून पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाचं रणशिंग फुंकणार आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आपलं उपोषणाचं हत्यार बाहेर काढलंय. आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची घोषणा केली आणि मराठा समाजासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे हे ३० मे पासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसतील. तर महाराष्ट्रातील इतर भागात शांततेत आंदोलन करण्याचं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू राहील. तीन कोटींपेक्षा जास्त मराठी आंदोलनात सहभागी होतील, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर सरकारला आता वेळ वाढवून दिला जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण करण्याची घोषणा का केली, नेमक्या मागण्या काय आहेत आणि आरक्षणाची ही लढाई आता कोणत्या वळणावर आहे? तेच या व्हिडिओतून समजून घेऊ
Read more