BMC vs Mumbai High Court : जीव गेल्यानंतरच कार्यवाही करणार का? हायकोर्टाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे
मुंबई....देशाची आर्थिक राजधानी, सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका, अब्जावधींची बजेट्स आणि आकाशाला भिडणारे दावे... पण प्रत्यक्षात मिळतं काय? तर तुंबलेली मुंबई, रखडलेली लोकल सेवा, रस्त्यांवरचे जीवघेणे खड्डे आणि मृत्यूचे सापळे बनलेली उघडी मॅनहोल्स. याच मुंबईत मुसळधार पाऊस आला की मुंबईकरांच्या काळजात धस्स होतं. मुंबईचा पाऊस जितका रोमँटिक, तितकाच तो मुंबईकरांच्या जीवावर उठणारा ठरतो. याचाच प्रत्यय २ जुलै रोजी साकीनाका परिसरात घडलेली अस्लम शेख यांच्या घटनेनं आला. ही घटना म्हणजे या प्रशासकीय अनास्थेचा आणि संतापजनक ढिसाळपणाचा सर्वात ताजा आणि पुरावा आहे. मुंबई महापालिकेची सत्ता बदलली, नवे लोकप्रतिनिधी आले पण मुंबईकरांची वाताहत मात्र वर्षानुवर्षे तशीच सुरू आहे. नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेवर ओढलेले अत्यंत तीव्र ताशेरे ओढले आणि खडे बोल सुनावले आहेत. सामान्य जनतेच्या जिविताची किंमत या यंत्रणांसाठी कवडीमोलाची झाली आहे का असा जाबच थेट विचारण्यात आला. हायकोर्टानं नेमके काय ताशेरे ओढले, त्यावर महापालिकेनं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..
Read more