MLC Election : अहिल्यानगर विधानपरिषदेतून ऐनवेळी निलेश लंकेंच्या पत्नीची माघार, कारण काय?
अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपनं निष्ठावंतांना बाजूला सारून प्राजक्त तनपुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणे लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असं चित्र होतं. मात्र अखेरच्या क्षणी राणी लंके यांनी माघार घेतली आणि त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. शिवाय काँग्रेस उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय पानसरे यांनी अपक्ष अर्ज भरून नवा ट्विस्ट या निवडणुकीत आणलाय. अहिल्यानगर विधानपरिषदेचं नेमकं समीकरण काय आहे? तनपुरेंविरोधात राणी लंके यांनी माघार का घेतली? हे सविस्तर या व्हिडिओतून समजून घेऊ..
Read more