US मध्ये Non-citizens ना १० दिवसात पत्ता बदलल्याचं USCIS ला कळवणं बंधनकारक, अन्यथा कारवाईची शक्यता

जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक अमेरिकेत नोकरी, शिक्षण किंवा कोणत्याही व्हिसावर राहत असाल, आणि तुम्ही नुकतेच घर बदलले असेल—किंवा बदलणार असाल—तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.अमेरिकेचे इमिग्रेशन विभाग म्हणजेच USCIS ने सर्व Non-citizens एक कडक इशारा आणि नियम जारी केला आहे. जर तुम्ही अमेरिकेत घर बदलले, तर नवीन पत्ता बदलल्यापासून अवघ्या १० दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंद इमिग्रेशन विभागाकडे करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. अनेकदा लोक केवळ टपाल सेवेकडे (USPS) पत्ता बदलतात आणि मोकळे होतात; पण ही खूप मोठी चूक ठरू शकते! यामुळे तुमचा ग्रीन कार्ड किंवा व्हिसाचा अर्ज रद्द होऊ शकतो, किंवा महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होऊ शकतात. हा नियम काय आहे? हा कोणासाठी लागू आहे? आणि अवघ्या २ मिनिटांत ऑनलाईन पत्ता कसा अपडेट करायचा? या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर एक्सप्लेनर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
Read more