४१ तोळे सोनं, ५ किलो चांदी अन् दुबईत घर, विक्रम काकडेंची अफाट संपत्ती

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे... ते नाव म्हणजे विक्रम संजय काकडे! दरम्यान, कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्याने विक्रम काकडे यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून थेट उमेदवारी मिळवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे देखील पुणे विधान परिषदेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र सुनील टिंगरेंना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील बोलावून दाखवली. तरीही पार्थ पवारांनी झुकतं माप देऊन विक्रम काकडे यांनाच उमेदवारी दिली. हे विक्रम काकडे नेमके कोण आहेत, त्यांची १५० कोटींची संपत्ती आणि जय पवारांना दिलेलं १० कोटींचं कर्ज या सगळ्याची माहिती या व्हिडिओतून घेऊयात..
Read more