Nirmala Sitharaman यांचं अर्थमंत्रीपद जाण्याची चर्चा, Shaktikant Das नवे अर्थमंत्री होण्याची चर्चा

#CabinetReshuffle2026 #NirmalaSitharaman #Shaktikanta Dasदिल्लीच्या राजकीय वर्तुळातून सध्या खातेबदल आणि नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची चर्चा आहे. या फेरबदलात अनेक मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, तर काहींना थेट मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. पण या सगळ्या चर्चेत एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ते म्हणजे भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आणि सलग ९ वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद जाऊ शकतं! विशेष म्हणजे, त्यांच्या जागी एका अशा व्यक्तीचं नाव आघाडीवर आहे, जी व्यक्ती भाजपच्या कोअर केडरचा म्हणजेच राजकारणाचा भागच नाहीये. ते नाव आहे आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि सध्या थेट पंतप्रधान मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शक्तिकांत दास! आता प्रश्न असा पडतो की, निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद नक्की का जाऊ शकतं? शक्तिकांत दास नेमके कोण आहेत? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.
Read more