आष्टीकर एकनाथ शिंदेंना भेटले, राजभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंसोबत एकाच मंचावर, ऑपरेशन टायगरचे संकेत?
एकीकडे एकनाथ शिंदे यांचे नेते ऑपरेशन टायगरवर अनेक दावे करताना दिसत आहेत. ठाकरेंचे जवळपास सात खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच गेल्या ४८ तासांत दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. पहिली घडामोड म्हणजे हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट. आणि दुसरी घडामोड म्हणजे नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे हे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एकाच जाहीर मंचावर एकत्र दिसणे. या दोन्ही घटनांमुळे राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर' ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या भेटींमागे नेमके काय कारण आहे? खासदारांनी यावर काय स्पष्टीकरण दिले आहे? आणि ठाकरे गटाची यावर काय भूमिका आहे? तेच या व्हिडिओतून समजून घेऊ...
Read more