शिवसेना ठाकरेंचीच धनुष्यबाण चिन्हाचा शिंदेंनी फायदा घेतला; सिब्बलांनी ठासून सांगितलं

महाराष्ट्र राजकारणातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना कुणाची? या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात घमासान पाहायला मिळालं. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला, ज्याने या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण दिलं आहे. सिब्बल यांनी थेट मागणी केली आहे की — 'शिवसेनेचं मूळ 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंना परत करा, अन्यथा ते चिन्ह त्वरित गोठवा!' पण सिब्बल यांनी ही गोठवण्याची मागणी का केली? आणि एकेकाळी ज्या मुद्द्यावरून शिंदे गटाने चिन्ह गोठवायला लावलं होतं, आज तोच हत्यार ठाकरे गट कसा वापरतोय? चला, समजून घेऊया या सविस्तर व्हिडिओ एक्सप्लेनरमध्ये.
Read more