MLA Disqualification : आता शिंदेंना अपात्र करु शकतो का? न्यायमूर्तींचा ठाकरेंच्या वकीलांना थेट सवाल

#shivsena #mladisqualification #supremecourthearing #devdattakamatशिवसेना पक्ष आणि चिन्ह्याच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत आज उद्धव ठाकरेंच्या वतीनं बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी दहाव्या अनुसूचीचा असा अर्थ लावू नये ज्यामुळे पक्षांतर करण्यास मुभा मिळेल. शिवसेना हे नाव ठाकरे गटाचेच आहे आणि शिंदे गटाला ते मिळू शकत नाही. शिंदेंनी धनुष्यबाण चिन्हाचा वापर करणे ही न्यायाची बाब नाही. तो त्या चिन्हा अनधिकृत वापर ठरेल. एखादी बेकायदेशीर कृती करून स्वत:साठी कायदेशीर हक्क निर्माण करू शकत नाही. ते चिन्ह गोठवले पाहिजे. जर ते चिन्ह आम्हाला मिळू शकत नसेल तर ते गोठवणेच आवश्यक आहे अशी मागणी करत कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवला. यानंतर ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी कोर्टात युक्तिवादाला सुरूवात केली. या सुनावणीदरम्यान देवदत्त कामत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्यात झालेला थेट संवाद सर्वाधिक चर्चेत राहिला. 'न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र घोषित करू शकतं का?' या मुद्द्यावर कामत आणि न्यायमूर्ती बागची यांच्यात झालेली चर्चा नेमकी काय होती? कामत यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय.. तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया..
Read more