Ashok Kharat Case : कडक बंदोबस्तात भोंदू खरातला मुंबईत आणलं, सगळ्या हिशोबांचा जाब ED विचारणार
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता थेट ईडीच्या जाळ्यात अडकलाय! महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या बाबाची संपत्ती पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावलेत. भोंदू खरात प्रकरणात आता ED कडून आणखी कडक पावले उचलण्यात आली आहे. ईडीने अशोक खरातला नाशिकहून थेट मुंबईत आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज ED ने अशोक खरात याला नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले आहे. खरात याची ED कडून आता चौकशी केली जाणार आहे. अशोक खरातच्या प्रकरणात ईडीची एन्ट्री कशी झाली, या प्रकरणात आतापर्यंत ईडीनं कशी कारवाई केली आहेत तेच या व्हिडिओतून समजून घेऊ..
Read more