MIM नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तांवरील मनपाच्या कारवाईवरून हायकोर्टानं जाब विचारला

छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे. ज्या प्रशासनाने कोर्टात 'कायदेशीर प्रक्रियेचे पालन करू' अशी हमी दिली, त्याच प्रशासनाने चोवीस तासांची मुदत संपण्याआधीच, भल्या पहाटे बुलडोझर चालवला! त्यामुळे कोर्टाने थेट मनपानं एवढी घाई का केली? असा जाब विचारलाय. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की, मनपाच्या या 'आतेताई' कारवाईवर हायकोर्टाने नेमके काय ताशेरे ओढले आहेत!
Read more